शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांना पत्र लिहून महाराष्ट्रातील सरकार पाडण्याचे प्रयत्न होत असल्याचे म्हटले आहे. त्याबद्दल गोव्यातील निवडणुकांचे प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. संजय राऊत हे रोज उठून मनोरंजन करतात. त्यांना काही तक्रार असेल तर त्यांनी न्यायालयात जावे. पण प्रत्यक्षात आपला छळ होत असल्याची आवई ते उठवत आहेत.
गोव्यातील निवडणुकीसाठी फडणवीस सध्या तिथे लक्ष ठेवून आहेत. त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी संजय राऊत यांच्या या पत्रासंदर्भात प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, पंतप्रधान मोदींच्या सरकारमध्ये कुणाचाही छळ केला जात नाही. त्यामुळे आपला छळ केला जात असल्याचे विधान संजय राऊत यानी करता कामा नये.
फडणवीस म्हणाले की, संजय राऊत हे संपादक आहेत. त्यांना माहीत आहे हेडिंग काय द्यायचे त्याप्रमाणे ते रोज करतात. त्यांच्याकडून ‘व्हिक्टिम कार्ड’ खेळण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यांना खरोखरच काही तक्रारी आहेत तर त्यांनी न्याय़ालयात आपले म्हणणे मांडावे. पण रोज सकाळी ९ वाजता मनोरंजन करतात. त्यापेक्षा अधिक त्याला महत्त्व देता येणार नाही. सिंह कधी कोल्ह्याच्या धमक्यांना घाबरत नाही.
हे ही वाचा:
मालिका विजयासाठी टीम इंडिया सज्ज
ईडीच्या भीतीने संजय राऊतांची आगपाखड
संजय राऊतांचे ‘ते’ पत्र पाहून त्यांची कीव वाटते
….म्हणून ब्रिटनमध्ये वीजपुरवठ्याला गांजाची नशा
गेल्या काही दिवसांपासून संजय राऊत हे अस्वस्थ झाले आहेत. भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी राऊत यांच्यावर घोटाळ्याचे आरोप करायला सुरुवात केल्यापासून संजय राऊत यांची अस्वस्थता वाढली आहे. त्यामुळे ते घरात घुसू, नागपुरात प्रवेश करू देणार नाही अशी भाषा विरोधकांसाठी वापरू लागले आहेत