इकोनॉमिक जिहादच्या विरोधात लढा देऊया

इकोनॉमिक जिहादच्या विरोधात लढा देऊया

कर्नाटकमध्ये सध्या हलाल मांसावरून राजकारण पेटले आहे. राज्यातील अनेक हिंदू संघटनांनी हलाल मांसावर बंदी घालण्याची मागणी केलेली आहे. तर अशातच आता भारतीय जनता पार्टीचे नेते सी टी रवी यांनी ट्विट करत या वादात उडी घेतली आहे. सी टी रवी हे भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस असून गट कायमच हिंदुत्वाला धरून आक्रमक भूमिका घेण्यासाठी चर्चेत असतात.

आताही या विषयात त्यांनी आक्रमकपणे ट्विट केले आहे. “हिंदूंसाठी आता आणखीन हलाल उत्पादने नकोत. इकोनॉमिक जिहादच्या विरोधात लढा देऊया.” असे जहाल ट्विट रवी यांनी केले आहे. त्यांच्या या ट्विटची चांगलीच चर्चा रंगली असून यावरून राज्यात नवा वाद होण्याची चिन्हे आहेत.

हे ही वाचा:

‘गरीब नवाज चाहे तो हिंदुस्तान का पता ना चले’…कव्वाली गायक नवाज शरीफची मुक्ताफळे! गुन्हा दाखल

महाराष्ट्र राज्य कोरोना निर्बंध मुक्त! सगळे उत्सव उत्साहात साजरे करा!!

आसाम, मणिपूर, नागालँडमधील AFSPA क्षेत्र कमी करण्याचा निर्णय

कर्नाटकात हलाल मांसवर बंदी घालण्याची मागणी

कर्नाटकात सध्या हलाल मांसाच्या मुद्द्यावरून कर्नाटक मधील राजकारण तापले आहे. हलाल मांस हा इस्लाम धर्मानुसार पवित्र समजला जातो. पण त्यासाठी प्राण्यांना अतिशय क्रूर पद्धतीने मारण्यात येते. तर त्यासोबतच इतर अनेक उत्पादने जसे की औषधे, कॉस्मेटिक वगैरेही हलाल प्रमाणपत्र प्राप्त असलेली असावीत असा आग्रह धरला जातो.

या संदर्भात मत व्यक्त करताना कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. “हा विषय नुकताच सुरू झाला आहे. आम्ही या संपूर्ण विषयाचा सखोल अभ्यास करू. याचा नियमावली किंवा तत्सम गोष्टींची कोणताही संबंध नाही. फक्त चालू असलेली ही प्रथा आहे. याबद्दल काही गंभीर आक्षेप नोंदवण्यात आले आहेत. आम्ही त्याबद्दल नक्की लक्ष घालू” असे बोम्मई यांनी म्हटले आहे.

Exit mobile version