सध्या कमी कपड्यांमध्ये व्हीडिओ करणारी उर्फी जावेद चांगलीच चर्चेत आहे. तिच्या या अंगप्रदर्शनावर भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्ष चित्रा वाघ यांनी आक्षेप घेत राज्य महिला आयोगाकडे तक्रार केली आहे. त्यावरून हे संपूर्ण प्रकरण बरेच चर्चेत आहे. चित्रा वाघ, महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर आणि उर्फी जावेद यांच्यात शाब्दिक चकमकी होत आहेत.
आता उर्फीने आपण कमी कपडे का घालतो याचे एक कारण दिले आहे. अंगावर पुरळ येत असल्यामुळे आपल्याला कमी कपडे घालावे लागतात. आपल्याला एलर्जी आहे, असे तिने म्हटले आहे. तिने आपले तसे फोटो आणि व्हीडिओही शेअर केले आहेत. त्यावरून चित्रा वाघ यांनी तिला फटकारले आहे. चित्रा वाघ यांनी म्हटले आहे की, आम्ही तुझ्या एलर्जीचा उपचार करू.
चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेत उर्फीला इशारा दिला आहे. व्यक्ती स्वातंत्र्य आहे पण स्वैराचाराला परवानगी नाही. ऐकलं तर ठीक नाहीतर आम्ही सगळ्या एलर्जीवर उपचार करू.
हे ही वाचा:
जयंत पाटीलही आता टोमणे मारून घालवत आहेत वेळ!
घुसखोर चीनला ‘तिरंगी हेल्मेट्स’ ची चपराक
समाजवादी पार्टीचा प्रवक्ता पत्रकारांच्या कुटुंबियांवरही आक्षेपार्ह टिप्पणी करत होता!
भूकंपाच्या धक्क्याने हिंगोली हादरले
उर्फीच्या अशा अंगप्रदर्शनावर त्यांनी महिला आयोगाला पत्र पाठविल्यानंतर महिला आयोगाने कोणतेही पाऊल न उचलता उलट महिलांना कोणते कपडे घालावेत याचे स्वातंत्र्य आहे, असे उत्तर महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी दिले आहे. त्यावरून पुन्हा चित्रा वाघ यांनी चाकणकर यांच्यावर टीका केली. चित्रा वाघ म्हणाल्या की, चाकणकर तुम्ही आता आलात मी यापूर्वी महिला आयोगात काम केले आहे. मी आयोगाला उत्तर दिले रुपाली चाकणकर या व्यक्तीला नाही. राजकारण करण्यासाठी ज्यांनी उड्या मारल्या त्यांना आम्ही गूळ खोबरे घेऊन बोलावले नव्हते. सुप्रियाताई ही राजकारणातली विकृती थांबवण्यास सांगत आहेत, त्यांना ती विकृती दिसत नाही का?