प्रदीप गावडे यांच्या अटकेवरून चित्रा वाघ कडाडल्या

प्रदीप गावडे यांच्या अटकेवरून चित्रा वाघ कडाडल्या

भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी ॲड.प्रदीप गावडे यांना शनिवारी मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सोशल मिडीयाद्वारे ठाकरे सरकारवर केलेल्या टीकेवरून गावडेंना ताब्यात घेण्यात आले आहे. या अटकेवरून सध्या महाराष्ट्राचे राजकारण तापताना दिसत आहे. भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ या गावडेंच्या अटकेवरून आक्रमक झाल्या असून त्यांनी महाराष्ट्र पोलिसांवर ताशेरे ओढले आहेत.

भारतीय जनता पार्टीचे पदाधीकारी ॲड. प्रदिप गावडे यांना मुंबई पोलीसांनी कारवाई केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर केलेल्या टीकेमुळे गावडे यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान मोदींवर खालच्या पातळीची टीका करण्यासाठी गुन्हा दाखल झालेल्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांवर कोणतीही कारवाई होत नसताना गावडे यांना मात्र कोणतीही पूर्वसूचना न देता पोलिसांकडून उचलण्यात आले आहे. शनिवार, २२ मे रोजी सकाळी प्रदिप गावडे यांना पुणे येथील त्यांच्या राहत्या घरातून उचलण्यात आले असून त्यांना मुंबईला आणण्यात आले आहे. या कारवाईनंतर भारतीय जनता पार्टी आक्रमक झालेली पाहायला मिळत आहे. भाजपाचे नेते,कार्यकर्ते, समर्थक हे ट्विटरच्या माध्यमातून या अटकेचा निषेध करताना दिसत आहेत.

हे ही वाचा:

ॲड. प्रदिप गावडेंवर ठाकरे सरकारची ‘तत्पर’ कारवाई

सरकार बरखास्त करा आणि राष्ट्रपती राजवट लागू करा

सरकारची वसुली पालिकेपर्यंत झिरपतेय

चक्रीवादळापेक्षा जास्त वेगाने मुख्यमंत्र्यांचा दौरा

भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विट करत गावडे यांना झालेली अटक बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे. तर त्याच वेळी पाच महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष मेहबूब शेख याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल असूनही त्याला अटक करायचे धारिष्ट्य महाराष्ट्र पोलिसांनी अद्याप दाखवलं नाही असा प्रहार चित्रा वाघ यांनी केला आहे.

Exit mobile version