ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल चुकीचे विधान केले आहे. त्यांच्या या चुकीच्या वक्तव्यावरून भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी त्यांना धारेवर धरले आहे.
संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देतानाडॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म महाराष्ट्रात झाला होता, असं म्हटल्याचं समोर आलं आहे. यावरून चित्र वाघ यांनी ट्वीटद्वारे संजय राऊतांना टोला लगावला आहे.
चित्रा वाघ म्हणाल्या, रोज सकाळी महाराष्ट्राला ज्ञान देणारे सर्वज्ञानी इतके अज्ञानी असतील, याचं दर्शन आज महाराष्ट्राला झाले आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म महाराष्ट्रात नाही, तर मध्य प्रदेशमधील महू येथे झाला आहे. इतकं सामान्य ज्ञान असू नये?आमचे आदर्श असणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल चुकीची माहिती देऊन तुम्ही काय मिळवता आहात? असे सवाल चित्रा वाघ यांनी उपस्थित केले आहेत.
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म महाराष्ट्रात नाही तर मध्यप्रदेशातील महू येथे झालाय इतकं सामान्य ज्ञान रोज सकाळी महाराष्ट्राला ज्ञान देणाऱ्या सर्वज्ञानींना असू नये ??
आमचे आदर्श असणाऱ्या महामानव डॉ.बाबासाहेबांबद्दल चुकीची माहिती देऊन तुम्ही काय मिळवताय ?
…(१/२) pic.twitter.com/qEqVIzi6B1— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) December 15, 2022
तसेच, अशा पद्धतीने राष्ट्रपुरुषांचा अपमान तुम्ही करायचा आणि मोर्चेपण तुम्ही स्वत:च काढायचे, मूर्ख समजू नका महाराष्ट्र तुम्हाला पुरता ओळखून आहे, असं म्हणत चित्रा वाघ यांनी संजय राऊत यांचा जाहीर निषेध केला आहे.
लो कर लो बात…
सर्वज्ञानी @rautsanjay61 जी म्हणताहेत
बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म महाराष्ट्रात झाला …अहो…महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म मध्यप्रदेशातील महू येथे झाला आहे
तर हे असं आहे सर्वज्ञानी यांचं अगाध ज्ञान@BJP4Maharashtra @BJP4Mumbai pic.twitter.com/tTjb5GFjyW
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) December 15, 2022
हे ही वाचा :
हत्या झालेली वीणा कपूर आणि जिवंत वीणा कपूर यामुळे उडाला गोंधळ
ओसामा बिन लादेनचे स्वागत करणाऱ्यांनी उपदेश करू नयेत
संजय राऊत नेमके काय म्हणाले होते?
लोकशाहीमध्ये असं घडू नये पण दुर्दैवाने महाराष्ट्रात घडत आहे. ज्या महाराष्ट्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला, ज्यांनी लोकशाही जन्माला घातली त्या महाराष्ट्रात हे घडतय दुर्दैवं आहे महाराष्ट्राचं, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे. दरम्यान, संजय राऊत यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.