वीर सावरकरांवर केलेल्या वक्तव्यामुळे काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर पुन्हा एकदा देशभरातून टीका होत आहे. आदित्य ठाकरे यांच्या भारत जोडो यात्रेत सहभागी झाल्यामुळे महाराष्ट्रतही मोठ्या प्रमाणावर टीका होत आहे. भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश महिला मोर्चाच्या अध्यक्षा चित्रा वाघ याही रिंगणात उतरल्या आहेत. याप्रकरणी त्यांनी राहुल गांधींसोबतच आदित्य ठाकरे यांच्यावरही जोरदार टीका केली आहे. सावरकरांचा अपमान करणाऱ्या नेत्यासोबत बाळासाहेबांचा वारस, असा टोमणा चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटमध्ये आदित्य ठाकरे यांना लगावला आहे.
राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीवर आक्षेप घेत ट्विटमध्ये चित्रा वाघ यांनी स्वातंत्र्यसैनिक वीर सावरकर यांच्यावरून सुरू असलेल्या वादाचा संदर्भ दिला आहे. चित्रा वाघ म्हणाल्या,कोणीतरी सांगितलेला इतिहास ऐकायचा आणी काहीही बोलायचं ही कुठली वैचारिक प्रगल्भता..म्हणे सावरकरांनी कोणा दुसऱ्याकडून स्वतःवर पुस्तक लिहून घेतलं. हा रागांचा बेसूर झालेला नवा राग का ?
कोणीतरी सांगितलेला इतिहास ऐकायचा आणी काहीही बोलायचं ही कुठली वैचारिक प्रगल्भता..म्हणे सावरकरांनी कोणा दुसऱ्याकडून स्वतःवर पुस्तक लिहून घेतलं
हा रागांचा बेसूर झालेला नवा राग का ?आश्यर्य तर या गोष्टीचंही वाटतं कि सावरकरांचा सतत अपमान करणाऱ्या सोबत मा.बाळासाहेबांचे वारसदार फिरतात..— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) November 17, 2022
बाळासाहेबांचे वारसदार राहुल गांधींसह सावरकरांचा अवमान करणाऱ्यांवर जोरदार हल्ला चढवत चित्रा वाघ यांनी आदित्य ठाकरे आणि त्यांच्या भारत जोडो यात्रेत सहभागी असलेल्या ठाकरे गटावरही निशाणा साधला आहे .आश्यर्य तर या गोष्टीचंही वाटतं कि सावरकरांचा सतत अपमान करणाऱ्या सोबत बाळासाहेबांचे वारसदार फिरतात तरी कसे ?? असा प्रश्न चित्र वाघ यांनी विचारला आहे.
हे ही वाचा :
‘राहुल गांधी हा मनोरुग्ण, सावरकर समजण्याइतकी अक्कल या माणसामध्ये नाही’
आम्हाला परिवार नाही का? करमुसेंचा आव्हाड यांना सवाल
११ वर्षे सावरकरांसारखा यातना भोगणारा काँग्रेसचा नेता दाखवा!
धारावीत बाळासाहेब ठाकरे दवाखाना
वारसदार हे कुटुंबात जन्म झाल्यानं होत नाही तर विचारांनी असतात, हेच खरं. ज्यांच्या जाज्वल्य देशभक्तीला पुजायला हवं, त्यांची याच महाराष्ट्रात अवहेलना करण्याची हिम्मत कोणी करतंय ? रक्त सळसळत नाही का ? असा संतप्त सवाल चित्र वाघ यांनी आपल्या ट्विटमध्ये केला आहे .
तरी कसे ??
वारसदार हे कुटुंबात जन्म झाल्यानं होत नाही तर विचारांनी असतात, हेच खरं.ज्यांच्या जाज्वल्य देशभक्तीला पुजायला हवं, त्यांची याच महाराष्ट्रात अवहेलना करण्याची हिम्मत कोणी करतंय ? रक्त सळसळत नाही का ? @ShivSena @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @cbawankule
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) November 17, 2022