27 C
Mumbai
Tuesday, January 7, 2025
घरराजकारणदादा क्या हुआ तेरा वादा?

दादा क्या हुआ तेरा वादा?

Google News Follow

Related

एमपीएससीच्या नियुक्त्या ३१ जुलैपर्यंत पूर्ण करण्याच्या आश्वासनावरून सध्या ठाकरे सरकारला घेरले जात आहे. राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असणारी भारतीय जनता पार्टी यावरून चांगलेच आक्रमक झालेली दिसत आहे. भाजपा नेते या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना घेरताना दिसत आहेत. भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी देखील ट्विटरवरून अजित पवार यांना सवाल केला आहे.

या महिन्याच्या सुरुवातीलाच पार पडलेल्या राज्याच्या पावसाळी अधिवेशनात एमपीएससी भरतीचा मुद्दा चांगलाच गाजला होता. स्वप्नील लोणकर या तरुणाने केलेल्या आत्महत्येमुळे संपूर्ण अधिवेशनात एमपीएससीच्या मुद्द्यावरून विरोधक चांगलेच आक्रमक झालेले दिसेल. ५ जुलैच्या दिवशी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधिमंडळातून अशी घोषणा केली की एमपीएससीमार्फत भरण्यात येणारी सर्व रिक्त पदे ही ३१ जुलै म्हणजेच महिना अखेरपर्यंत भरली जातील.

हे ही वाचा:

आणखी स्वप्निल लोणकर व्हावेत असं सरकारला वाटतंय का

पूर्व आशियात कोरोनाची तिसरी लाट, भारतालाही धोका?

झिका का आला पुण्यात?

महाराष्ट्रातील पूरपरिस्थिती संदर्भात मुख्यमंत्र्यांना देवेंद्र फडणवीस यांनी लिहिले पत्र

पण आता ३१ जुलै तारीख आली तरीही एमपीएससी मार्फत भरण्यात येणारी पदे भरण्यात आलेली नाहीत. यावरूनच भाजपा नेते आक्रमक होऊन ठाकरे सरकारवर हल्लाबोल करताना दिसत आहेत. भाजपा उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनीदेखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांना उद्देशून टोला लगावला आहे. स्वप्निलच्या मृत्यूचा तुम्हाला इतक्यात विसर पडला का? दादा क्या हुआ तेरा वादा? असे म्हणत चित्रा वाघ यांनी सरकारला सवाल केला आहे.

या आधी भाजपा आमदार गोपीचंद पडळकर, माजी खासदार निलेश राणे यांनी देखील आक्रमकपणे या मुद्द्यावरून ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. पण अजूनही सरकार कडून या विषयात कोणतेही ठोस उत्तर देण्यात आलेले नाही.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा