नाना पटोलेंना समजावणे म्हणजे गाढवापुढे वाचली गीता

नाना पटोलेंना समजावणे म्हणजे गाढवापुढे वाचली गीता

भारतीय जनता पार्टीचे नेते आणि माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. नाना पटोले यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेला बावनकुळेंनी प्रत्युत्तर दिले आहे. नाना पटोलेंना समजावणे म्हणजे गाढवापुढे वाचली गीता असे म्हणत चंद्रशेखर बावनकुळेंनी नाना पटोलेंवर घणाघात केला आहे.

देशात कोरोनाचा उद्रेक सुरु असून महाराष्ट्राला त्याचा सर्वाधिक फटका बसला आहे. पण अशा परिस्थितीतही महाराष्ट्रात राजकीय आखाडा पाहायला मिळत आहे. १५ मे च्या शनिवारी देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहीत महाराष्ट्रातील कोरोना परिस्थितीवर निशाणा साधला आणि राज्याच्या राजकारणात त्याचीच चर्चा सुरु झाली. फडणवीसांनी सोनिया गांधींना लिहिलेले पत्र राज्यातील नेत्यांना चांगलेच झोंबले. यानंतर महाविकास आघडीच्या नेत्यांनी देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केले.

हे ही वाचा:

निवडणूक सरली, आश्वासनं विरली

नवाब मलिकांनी गालावर माशी बसवावी, कोण जोरात मारतं याची स्पर्धा घ्यावी

पब्लिक सब जानती है…देवेंद्र फडणवीसांचे सोनिया गांधींना पत्र

नक्की कोण खरं? सरकारी वकील की काँग्रेस?…भाजपाचा सवाल

“मोदींमुळे लोक मरत असताना फडणवीसांनी सोनिया गांधींना पत्र लिहिणे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा” असे म्हणत नाना पटोले यांनी देवेंद्र फडणवीसांवर टीका केली होती. पटोलेंच्या याच टीकेला बावनकुळे यांनी उत्तर दिले आहे. पटोलेंच्या ट्विटला उत्तर देताना बावनकुळे म्हणतात, “देवेंद्र फडणवीस यांनी सोनिया गांधी यांना लिहलेल्या पत्राचा मजकूर न वाचता ट्विट करणाऱ्यांना समजावणे म्हणजे गाढवापुढे वाचली गीता.” नाना पटोले यांनी सकारात्मक काम करावे असेही बावनकुळेंनी म्हटले आहे.

Exit mobile version