31 C
Mumbai
Sunday, November 24, 2024
घरराजकारण'शरद पवारांच्या राजकीय आयुष्यात शपथेला नाही तर खंजीराला महत्व'

‘शरद पवारांच्या राजकीय आयुष्यात शपथेला नाही तर खंजीराला महत्व’

शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांची टीका

Google News Follow

Related

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाकडून आज निवडणुकीसाठीचा जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला. या जाहीरनाम्यात काही प्रमुख मुद्द्यांचा समावेश शरद पवार गटाकडून करण्यात आला आहे. यामध्ये गॅस-सिलेंडरच्या दरांपासून महिलांसाठीच्या आरक्षणापर्यंतच्या मुद्द्यांबाबत भाष्य करण्यात आले आहे.दरम्यान, शरद पवार पक्षाच्या जाहीरनाम्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी टीका केली आहे.शरद पवारांचा शपथनामा म्हणजे जगातील सगळ्यात मोठी फसवणूक असल्याचे बावनकुळे म्हणाले आहेत.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विट करत लिहिले की, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने “शपथनामा” नावाने लोकसभा निववडणुकीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला.जगातील ही सगळ्यात मोठी फसवणूक म्हटली पाहिजे.खरंच शरद पवार आणि शपथेचा काही संबंध आहे का?महाराष्ट्रात शपथेला प्राणापेक्षा अधिक महत्व आहे.

हे ही वाचा:

बेकायदेशीर आयपीएल स्ट्रीमिंग ऍप प्रकरणी सायबर सेलकडून तमन्ना भाटियाला समन्स

पॅलेस्टाइन पाठिंब्याचे, इस्रायलविरोधाचे लोण पसरले अमेरिकेतील विद्यापीठांत

तेलंगणा, आंध्रमधील मुस्लिमांचे आरक्षण निवडणुकीच्या केंद्रस्थानी

“सांगलीची जागा ठाकरे गटाला देऊन चूक केली आहे”

ते पुढे म्हणाले की, २६ एप्रिल १६४५ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांसह हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली ती पूर्ण केली.आणि शरद पवारांच्या राजकीय आयुष्यात?शपथेला नाही, खंजीराला महत्व आहे !!१९७७ मध्ये आणीबाणी नंतर काँग्रेस पक्ष फुटला. इंदिरा गांधी यांची साथ सोडून शरद पवार ब्रह्मानंद रेड्डी यांच्या रेड्डी काँग्रेसमध्ये गेले.

१९७८ मध्ये मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसून वसंतदादांचे सरकार पाडले.१९८० मध्ये ४० आमदारांसह बंडखोरी करत पुलोद सरकार स्थापन करून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले.१९८८ मध्ये शरद पवार पुलोदमधून पुन्हा काँग्रेसमध्ये गेले.१९९९ मध्ये काँग्रेसमधून पुन्हा बाहेर राष्ट्रवादीची स्थापना केली.२०१९ मध्ये अजितदादांना शब्द दिला.. आणि फिरवला!२०१९ मध्ये महाविकास आघाडीची स्थापना केली.खरंच सांगा, शरद पवार आणि शपथेचा काही संबंध आहे का?

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
195,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा