केंद्राने निधी दिला, तरीही ठाकरे सरकारने उभारले नाहीत ऑक्सिजन प्लॅन्ट्स

केंद्राने निधी दिला, तरीही ठाकरे सरकारने उभारले नाहीत ऑक्सिजन प्लॅन्ट्स

राज्यात एकीकडे कोरोना रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीतपणे होत नसतानाच एक धक्कादायक माहिती सामोर येत आहे. मोदी सरकारकडून महाराष्ट्राला जानेवारी महिन्यातच ऑक्सिजन प्लॅन्ट उभारण्यासाठी निधी देण्यात आला होता. पण तरीही ठाकरे सरकारकडून ऑक्सिजन प्लॅन्ट उभारण्यात आलेले नाहीत असा आरोप होत आहे. ठाकरे सरकारने दहा प्लॅन्ट्सपैकी फक्त एक प्लॅन्ट उभारल्याचे म्हटले जात आहे.

महाराष्ट्रात सध्या कोरोनाचे थैमान सुरूच आहे. अशा परिस्थितीत रुग्णांसाठीच्या ऑक्सिजनची मागणी वाढली आहे. पण ऑक्सिजनचा आवश्यक तितका पुरवठा होताना मात्र दिसत नाहीये. ऑक्सिजनचा हा पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत. केंद्र सरकारकडून नुकतीच महाराष्ट्रासाठी ऑक्सिजन एक्सप्रेस पाठवण्यात आली. ही एक्सप्रेस शुक्रवार २३ एप्रिल रोजी महाराष्ट्रात दाखल झाली आणि राज्यात विविध ठिकाणी ऑक्सिजनचे टँकर्स पोहोचले. तरीही महाराष्ट्रातील ठाकरे सरकारकडून सतत केंद्र सरकारकडे बोट दाखवले जात आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दोन दिवसांपूर्वीच ऑक्सिजनसाठी केंद्र सरकारच्या पाय पडायला तयार असल्याचे विधान केले. पण अशातच एक धक्कादायक माहिती समोर येत आहे.

हे ही वाचा:

मोदी सरकारने आणले ई-प्रॉपर्टी कार्ड, काय आहेत फायदे?

सिंगापूरमधूनही ऑक्सिजन वहनाचे टँकर्स

ऑक्सिजन पुरवठ्याशी निगडीत उपकरणांवरील आयात शुल्क माफ

फडणवीसांच्या प्रयत्नाने नागपूरला मिळाला ऑक्सिजन

केंद्र सरकारकडून जानेवारी महिन्यातच महाराष्ट्राला दहा ऑक्सिजन प्लॅन्ट उभारण्यासाठी निधी देण्यात आला होता. पण अद्याप राज्य सरकारने त्या निधीतून केवळ एक ऑक्सिजन प्लॅन्ट उभारल्याचे कळत आहे. ५ जानेवारी २०२१ च्या पंतप्रधान कार्यालयाच्या प्रसिद्धी पत्रकानुसार ‘पीएम केअर्स’ च्या माध्यमातून २०१.५८ कोटी रुपयांचा निधी हा सर्व राज्यांना मिळून देण्यात आला. या निधीतून देशभरात एकूण १६२ नवे वैद्यकीय वापरासाठीच्या ऑक्सिजनचे प्रकल्प स्थापन करण्यात येणार होते. या प्रकल्पांची क्षमता ही १५४. १९ मॅट्रिक टन असणार होती. कोणत्या राज्याला किती प्रकल्प उभारण्यासाठी तरतूद करण्यात आली हे देखील स्पष्ट करण्यात आले होते.

महाराष्ट्राच्या वाट्याला १० प्रकल्प आले होते. जे उत्तर प्रदेशनंतरचे सर्वाधिक प्रकल्प होते. पण या दहा प्लॅन्ट्सपैकी महाराष्ट्र सरकारने केवळ एक प्लॅन्ट उभारल्याचा आरोप होत आहे. भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय संघटन महामंत्री बी.एल.संतोष यांनी हा गंभीर आरोप केला आहे. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी ठाकरे सरकारला लक्ष्य केले आहे.

Exit mobile version