मंगळवारी महाराष्ट्राच्या सत्ताधारी महाविकास आघाडी तर्फे खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येचा मुद्दा उचलून धरण्याचा प्रयत्न केला गेला. मोहन डेलकर यांच्या परिवाराने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधिमंडळात भेट घेतली. याच भेटीचा आधार घेत भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री ठाकरेंवर निशाणा साधला आहे. “मोहन डेलकरांच्या परिवाराचे कोरोना चाचणी प्रमाणपत्र बघितले का उद्धवजी?” असा तिखट सवाल भातखळकर यांनी विचारला आहे.
महाराष्ट्र विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. मंगळवारी अधिवेशनात मनसुख हिरेन यांच्या मृत्यूचा विषय चांगलाच गाजला. विरोधी पक्षाने या विषयावरून सरकारला चांगलेच घेरले. उत्तरे नसलेल्या सत्ताधारी पक्षाकडून आपल्या बचावासाठी मोहन डेलकर यांच्या आत्महत्येचा विषय काढला गेला.
सचिन वाझेंविरोधात गुन्हा का दाखल केला नाही? असा प्रश्न विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी विचारल्यावर शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी माजी खासदार मोहन डेलकर आत्महत्त्या प्रकरणाचा मुद्दा उपस्थित केला. परंतु फडणवीस यांनी डेलकर यांची आत्महत्त्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठीच सभागृहासमोर ठेवल्याने सभागृहात प्रचंड गदारोळामध्येही शांतता पसरली होती.
हे ही वाचा:
दरम्यान मोहन डेलकर यांच्या कुटुंबियांनी मुख्यमंत्री ठाकरेंची भेटही घेतली. पण अधिवेशनाच्या कालावधीत कोरोना चाचणी न केल्याने २२ आमदारांना प्रवेश नाकारला, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना प्रवेश नाकारण्यात आला. पण डेलकर कुटुंबियांना मात्र मुख्यमंत्री भेटले. यावरूनच ट्विट करत अतुल भातखळकरांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले आहे.
२५ आमदारांना कोरोना चाचणी नाही, म्हणून प्रवेश नाकारला! मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना प्रवेश नाकारला.
डेलकर कुटुंबियांना भेटलात हे उत्तम, पण त्यांचे कोरोना चाचणी प्रमाणपत्र बघितले का उद्धवजी ? नियम सर्वांना सारखेच हवेत.
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) March 9, 2021