25 C
Mumbai
Friday, December 27, 2024
घरराजकारणअरे मंदबुद्धी...ते जंतू नसतात विषाणू असतात

अरे मंदबुद्धी…ते जंतू नसतात विषाणू असतात

Google News Follow

Related

आपल्या आक्रमक शैलीसाठी प्रसिद्ध असणारे भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार अतुल भातखळकर यांनी रविवारी शिवसेना आमदार संजय गायकवाड यांचा चांगलाच समाचार घेतला. संजय गायकवाड यांच्या एका व्हिडीओवर प्रतिक्रिया देताना त्यांनी शिवसेनेची पार पिसं काढली. त्यांच्या या आक्रमक ट्विटवर नेटकरी बेहद्द खुश झालेले दिसत आहेत.

शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांची शनिवारी जीभ घसरली. भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना त्यांनी पातळी सोडली. “मला जर कोरोनाचे जंतू सापडले असते, तर मी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडात कोंबून टाकले असते.”, असे वक्तव्य शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी केले. फडणवीसांनी कोरोनावरुन राजकारण करु नये, असा इशाराही त्यांनी दिला. ते बुलढाण्यात बोलत होते. यावेळी संजय गायकवाड यांनी सभ्यतेच्या सर्व मर्यादा ओलांडून अत्यंत शेलक्या शब्दांत देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले.

हे ही वाचा:

पहिला प्रयोग तुझ्या घरकोंबड्या मुख्यमंत्र्यावर कर

…. तर मी कोरोनाचे ‘जंतू’ देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडात कोंबले असते

ठाकरे सरकारच्या मंत्र्यांना फक्त वसुलीच कळते

दुपारी मंत्री दम देतात, संध्याकाळी अटक होते

गायकवाड यांच्या या वक्तव्याचा सगळीकडून निषेध होत असून त्यांच्यावर भाजपाकडून चांगलाच हल्ला चढवला आहे. भाजप नेते आमदार अतुल भातखळकर यांनी तर गायकवाडांचा उल्लेख थेट ‘मंदबुद्धी’ असाच केला. त्यांचा रोख गायकवाड यांच्या वक्तव्यातील चुकीकडे होता. गायकवाड यांनी कोरोना विषाणूचा उल्लेख जंतू असा केला होता. त्यावरूनच भातखळकरांनी निशाण साधला. “यथा सूडबुद्धी जनाबसेना पक्षप्रमुख, तथा टुकार जनाबसैनिक…” असा टोलाही आमदार अतुल भातखळकर यांनी लगावला आहे. अतुल भातखळकर यांच्या सोबतच भाजपा आमदार नितेश राणेंनीही गायकवाडांना धारेवर धरलेले दिसले.

spot_img

लेखकाकडून अधिक

2 कमेंट

  1. नबाब मलिक सारखी टूकार भ्रष्ट मंडळी गोळा करुन राष्ट्रवादी नावाची टोळी तयार झाली आहे.. किंबहुना भ्रष्टाचार करणार्यांसाठीच राष्ट्रवादी हा नावालाच पक्ष परंतु प्रत्यक्षात वाटमारी करणार्यांची टोळी आहे.
    असे एक से एकाहून एक भ्रष्ट असणं हेच या टोळीप्रमुखाची अट असेल..

  2. राष्ट्रवादि कॉंग्रेस म्हणजे इकडुन तिकडुन तिकडम करुन जमा झालेल एक लुटारु टोलक आहे!ह्यांना जनतेशी काहि देणे घेणे नाहि! नाव राष्ट्रवादि परंतु महाराष्ट्र ,देश,जनता ह्याच्यासाठी एकहि कार्यक्रम किंवा योजना नाहि ! फक्त पैशापासुन सत्ता आणि सत्तेपासुन पैसा हा एकमेव कार्यक्रम !जन्माला आल्यापासुन ह्या पक्षाने जनहितार्थ एकहि काम केले नाहि ! सत्तेकरीता मान सम्मान गहाण ठेउन भरपुरउपभोग केला!फक्त एक काम छान झाले जेव्हडेहि ह्यांचे चट्टे बट्टे आहेत त्याची आर्थिक प्रगति भयंकर झाली !थोडक्यात …लुटो और लुटने दो ह्या तत्वावरचालत आपल्या चमच्यांची व आपली पुढिल ५० पिढ्यांची व्यवस्था करुन ठेवली …..

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा