आमदार अतुल भातखळकर करणार ‘मुंबई मॉडेल’ची पोलखोल

आमदार अतुल भातखळकर करणार ‘मुंबई मॉडेल’ची पोलखोल

भारतीय जनता पार्टीचे मुंबई प्रभारी आमदार अतुल भातखळकर हे ‘मुंबई मॉडेल’ची पोलखोल करणार आहेत. शनिवार, ११ जून रोजी रात्री १० वाजता ट्विटर स्पेसच्या माध्यमातून अतुल भातखळकर हे राज्याच्या जनतेशी संवाद साधणार आहेत. त्यावेळी ‘मुंबई मॉडेल’ या विषयावर बोलताना ते मुंबई महापालिकेच्या कारभाराचा पर्दाफाश करणार आहेत.

शिवसेनेची सत्ता असलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या कोरोना काळातील कारभाराचा ‘मुंबई मॉडेल’ या नावाखाली प्रचार केला जातो. पण हे मॉडेल फसवे असल्याचा आरोप भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांकडून वारंवार होत असतो. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तर थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून मुंबई मॉडेलच्या नावाखाली होत असलेल्या गैरकारभाराचा पाढा वाचला आहे. तर अतुल भातखळकर हे देखील वारंवार ट्विटरच्या माध्यमातून मुंबई महापालिकेच्या कारभाराचे वस्त्रहरण करत असतात.

हे ही वाचा:

अनधिकृत इमारतींबद्दल पालिका काय करते आहे?

तीन पक्ष एकत्र येऊन पडलो कसे? या प्रश्नावर चर्चा झाली असावी

संभाजीराजे छत्रपतींनी मराठा मोर्चा काढण्यात चालढकल करू नये

स्थलांतरित मुस्लिमांना कुटुंब नियोजनाचा सरमा यांचा सल्ला

शनिवारी ट्विटर स्पेसच्या माध्यमातून महापालिकेच्या भोंगळ कारभाराचा खरा चेहरा अतुल भातखळकर राज्याच्या जनतेसमोर उघड करणार आहेत. अतुल भातखळकर हे ट्विटरवर खूप सक्रिय असून आपल्या आक्रमक ट्विट्ससाठी कायमच चर्चेत असतात. ट्विटर या मायक्रोब्लॉगिंग साईटने नव्याने आणलेल्या ‘स्पेस’ या पर्यायातून एका व्हर्च्युअल मिटिंग रूम मध्ये वक्ता आणि श्रोते एकत्र येतात. जिथे वक्ता एका विशिष्ट विषयाला धरून श्रोत्यांशी संवाद साधतो. मुंबई भाजपाचे सचिव आणि मुंबई महापालिकेच्या शिक्षण समितीचे सदस्य प्रतीक कर्पे हे या स्पेसचे होस्ट असणार आहेत.

Exit mobile version