30 C
Mumbai
Saturday, January 4, 2025
घरराजकारणदेण्यापेक्षा मागणं हाच ठाकरे सरकारचा बाणा

देण्यापेक्षा मागणं हाच ठाकरे सरकारचा बाणा

Google News Follow

Related

भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर तोफ डागली आहे चौकटे चक्रीवादळ येतील नुकसानग्रस्तांना मदत करण्याच्या मुद्द्यावरून भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले आहे. देण्यापेक्षा मागणं हाच या ठाकरे सरकारचा बाणा झाला असा घणाघात भातखळकर यांनी केला आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वादळाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवार, २१ मे रोजी कोकण दौरा केला. पण मुख्यमंत्र्यांच्या या कोकण दौऱ्यावर चहू बाजूंनी जोरदार टीकेची झोड उठली आहे. तौक्ते वादळाचा फटका बसून नुकसान झालेल्या तीन महत्त्वाच्या जिल्ह्यांपैकी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फक्त रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना भेटी दिल्या. त्या भेटीतही त्यांनी ना झालेल्या नुकसानाची पाहणी केली, ना वादळग्रस्त नागरिकांची भेट घेतली. एकीकडे मोदी, फडणवीसांना टोमणे मारताना दुसरीकडे केंद्र सरकारकडे मदतीची मागणी उद्धव ठाकरेंनी केली आहे.

हे ही वाचा:

अनिल परबांचा दापोली रिसॉर्ट घोटाळा? राज्यपाल मागवणार अहवाल

शिवसेना कोकणी माणसाला संपवायला निघाली आहे

काका काका ओरडणाऱ्या घरकोंबडयाची राज्यभर चर्चा

हवेत गेलेले पाय जमिनीवर आलेलं बघून बरं वाटलं

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकार कडून आम्हाला पायाभूत सुविधा उभारण्यासाठी मदत लागेल असे भाष्य केले आहेत यावरूनच आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. “वादळग्रस्तांना राज्य सरकारकडून मदत जाहीर करण्याआधीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्राकडे झोळी पसरायची तयारी केलीय. पंचनाम्यांचा हिशेबही पूर्ण झाला नसताना ते केंद्राच्या तिजोरीत डोकावू लागलेत. देण्यापेक्षा मागणं हाच या ठाकरे सरकारचा बाणा झालाय.” असे भातखळकर यांनी म्हटले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
219,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा