26 C
Mumbai
Wednesday, December 25, 2024
घरराजकारण१०० कोटींच्या बोजाने दबलेल्या बार मालकांबाबत कळकळ पाहून कंठ दाटून आला

१०० कोटींच्या बोजाने दबलेल्या बार मालकांबाबत कळकळ पाहून कंठ दाटून आला

Google News Follow

Related

‘१०० कोटींच्या बोजाने दबलेल्या बार मालकांबाबत आपली कळकळ पाहून माझा कंठ दाटून आला’ असा शालजोडीतला टोला भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार अतुल भातखळकर यांनी शरद पवारांना लगावला आहे. शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून हॉटेल आणि बार व्यावसायिकांना काही सवलती देण्याचे आवाहन केले आहे. यावरूनच आमदार अतुल भातखळकर यांनी पवारांवर निशाणा साधला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार असलेले शरद पवार हे दोन मोठ्या शास्त्रक्रियांमधून बरे होऊन पुन्हा राजकीयदृष्टया सक्रिय झाले आहेत. शुक्रवार. ७ मे रोजी पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. या पत्रातून शरद पवार यांनी हॉटेल व्यावसायिक, बार मालक यांच्यासाठी सरकारकडून काही सवलती देण्यात याव्यात अशी मागणी केली आहे. कोविडच्या महामारीत राज्यात संचारबंदी लावण्यात आल्यामुळे हा वर्ग आर्थिक संकटात सापडला आहे असे सांगताना हॉटेल आणि परमिटबार मालकांना अबकारी कराचा भरणा किमान चार हफ्त्यात भरण्याची सवलत मिळावी, तर वीज बिलात सवलत आणि मालमत्ता करात सूट मिळावी, अशा विविध मागण्या पवार यांनी केल्या आहेत. पवारांनी आपल्या ट्विटर खात्यावरून हे मुख्यमंत्र्यांना लिहिलेले पत्र शेअर केले आहे.

हे ही वाचा:

मोदी निंदा करणाऱ्या सोरेनना जगन मोहननी झापले

मराठा आरक्षणासाठी नाही, बार मालकांसाठी पवारांनी लिहिले मुख्यमंत्र्यांना पत्र

परदेशातून महाराष्ट्राला मिळालेल्या मदतीबद्दल मविआत मतभेद

अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचे विमा संरक्षण अधांतरीच

बार मालकांच्या प्रकरणातून वेळ मिळाला तर थोडं मराठा आरक्षणाकडेही लक्ष द्या

यावरून आपल्या आक्रमक शैलीसातही प्रसिद्ध असलेले भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांनी शरद पवारांना लक्ष्य केले आहे. आपल्या ट्विटर खात्यावरून दोन जळजळीत ट्विट करत भातखळकरांनी पवारांना धारेवर धरले आहे. आपल्या पहिल्या ट्विटमध्ये भातखळकर यांनी शरद पवार हॉस्पिटलमधून सकुशल परत आल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे. पण त्याचवेळी ‘प्रकृती सावरल्यावर आपण सर्वप्रथम बार मालकांसाठी आवाज उठवलात, बहुधा मराठा आरक्षणाचे वृत्त आपल्या कानावर आले नसावे.’ असे म्हणत त्यांना चिमटाही काढला आहे. ‘बार मालकांच्या प्रकरणातून थोडा वेळ मिळाला तर मराठा आरक्षणाकडेही लक्ष द्या.’ असे भातखळकर म्हणाले आहेत.

तर दुसऱ्या ट्विटमध्ये भातखळकर यांनी अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या १०० कोटी खंडणीच्या अनुषंगाने पवारांवर उपहासात्मक भाष्य केले आहे. ‘१०० कोटींच्या बोजाने दबलेल्या बार मालकांबाबत आपली कळकळ पाहून माझा कंठ दाटून आला आहे हे मी नमूद करू इच्छितो.’ असे भातखळकर म्हणाले. तर याच वेळी ‘आपण शेतकऱ्यांसाठीही याच कळकळीने पत्र पाठवाल’ असेही भातखळकरांनी म्हटले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा