‘पप्पू आणि पप्पूगिरीच्या पेटंटचे सर्व हक्क काँग्रेसकडे राखीव आहेत.’ असे म्हणत भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांनी काॅग्रेसला जोरदार टोला लगावला आहे. महाराष्ट्रातील सत्ताधारी काँग्रेस पक्षाकडूनच कायदा हातात घेता एका कंपनीचे कार्यालय फोडण्याचा प्रकार घडला. त्यावरूनच आमदार अतुल भातखळकर यांनी काँग्रेसवर निशाणा साधला.
‘स्टोरिआ’ नावाच्या फ्लेवर्ड दुध बनवणाऱ्या एका कंपनीने आपल्या जाहिरातीत सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचा अपमान केल्याचा आरोप करत काँग्रेस पक्षाकडून या कंपनीचे कार्यालय फोडण्यात आले. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी या गुंडगिरीचे समर्थन करत त्याचा व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट केला. सोबतच हे करणाऱ्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन करत त्यांचे कौतुकही केले. या वरूनच भारतीय जनता पार्टी काँग्रेस विरोधात आक्रमक झाली आहे.
हे ही वाचा:
कोलकाता नाइट रायडर्सचे ‘इशारों इशारों में’
सौदी अरेबियातील विद्यार्थी गिरवतायंत रामायण, महाभारताचे धडे
देवेंद्र फडणवीसांचे ज्युलिओ रिबेरोंना खुले पत्र
भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट करत काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. “मोदींना मौत का सौदागर, चायवाला, शेठ अशी वाट्टेल ती हलकट विशेषणे लावणारे काँग्रेसचे फाजील नेते एका पप्पुमय जाहीरातीने बिथरले” असे भातखळकरांनी म्हटले आहे. तर “तोडफोड करणाऱ्या या गुंडांच्या टोळीला लॉकडाउन च्या नियमातून उद्धवजीनी विशेष सूट दिलेली दिसते.” असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनाही लक्ष्य केले आहे.
पंतप्रधान मोदींना चहावाला, मौत का सौदागर, शेठ अशी वाट्टेल ती हलकट विशेषणे लावणारे काँग्रेसचे फाजील नेते एका पप्पूमय जाहिरातीमुळे बिथरले. सत्ता आहे म्हणून ही मस्ती चालली आहे. तोडफोड करणाऱ्या या गुंडांच्या टोळीला लॉकडाउन च्या नियमातून उद्धवजीनी विशेष सूट दिलेली दिसते. https://t.co/p80vzeLq0h
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) April 27, 2021
दुसऱ्या ट्विटमध्ये तर भातखळकरांनी थेट ‘स्टेरिआ’ कंपनीच्या जाहिरातीचा व्हिडीओच ट्विट केला आहे. काँग्रेसचा संताप योग्यच आहे असे म्हणत पप्पू आणि पप्पूगिरीचे सर्व हक्क काँग्रेस कडे राखीव आहेत अशी बोचरी टीका त्यांनी केली आहे.
आलू से सोनाच्या धर्तीवर… यहा से घास डालुंगा वहा से दूध निकलेगा, अशी जाहिरात केल्यामुळे खवळलेल्या काँग्रेसवाल्यानी कंपनीचे कार्यालय फोडले.
संताप योग्यच आहे त्यांचा. कॉपीराईट वगैरे काही प्रकार आहे की नाही? पप्पू आणि पप्पूगिरीच्या पेटंटचे सर्व हक्क काँग्रेसकडे राखीव आहेत. pic.twitter.com/m1bNztKuKY— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) April 27, 2021
मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मंगल प्रभात लोढा यांनीही काँग्रेसवर निशाणा साधला आहे. राज्यात काँग्रेस सत्तेत आहे, म्हणून कायदा हाती घेणार का? असा संतप्त सवाल लोढा यांनी विचारला आहे. तर ज्युलिओ रिबेरो साहेब यावर आपण काय सल्ला द्याल? असा खोचक टोलाही त्यांनी लगावला आहे.
राज्यात काँग्रेस सत्तेत आहे, म्हणून कायदा हाती घेणार का? STORIA कंपनीविरोधात केलेल्या हिंसेचे समर्थन होऊच शकत नाही.
मुंबई काँग्रेसने केलेल्या हिंसेचा आम्ही जाहीर निषेध करतो.ज्युलिओ रिबेरो साहेब यावर आपण काय सल्ला द्याल? https://t.co/il9I0xnPSO
— Mangal Prabhat Lodha (@MPLodha) April 27, 2021