कोण म्हणतो देणार नाय, घेतल्या शिवाय जाणार नाय…भाजपाचा एल्गार

कोण म्हणतो देणार नाय, घेतल्या शिवाय जाणार नाय…भाजपाचा एल्गार

भारतीय जनता पार्टी मुंबई तर्फे गुरुवार दोन सप्टेंबर रोजी विश्वासघात मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते मुंबईतील भाजपाचे खासदार आमदार नगरसेवक पदाधिकारी ही मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झाले होते. यावेळी भाजपा मार्फ़त मुंबईतील वेगवेगळ्या प्रभाग समित्यांमध्ये निवेदन दिले गेले.

मुंबई भाजपाचे प्रभारी आमदार अतुल भातखळकर यांच्या नेतृत्वात मुंबईच्या आर साऊथ या प्रभाग समितीवर मोर्चाच नेण्यात आला. या मोर्चात आमदार योगेश सागर, इतर नगरसेवक, पदाधिकारी असे शेकडो लोक सहभागी झाले होते. अतुल भातखळकर यांनी यावेळी माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी ठाकरे सरकारच्या कारभाराचे धिंडवडे काढले आहेत.

हे ही वाचा:

अनिल देशमुखांच्या वकिलालाच अटक

अनिल देशमुख यांनी दरोडा घालायचा आणि पोलिसांनी काय हार घालायचा का?

‘दलाल’ व्हायरसचा बळी

भारत ओव्हलवर ५० वर्षांचा इतिहास मोडीत काढणार?

काय म्हणाले भातखळकर?
आमदार योगेश सागर, मी स्वतः आणि सर्व नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला. या मोर्चात आमच्या चार प्रमुख मागण्या आहेत. मुंबईकर जे सहन करताहेत. मुंबई उपनगरात १८ जुलैच्या पावसामुळे आणि त्याच्या आधीच्या दोन्ही वादळामुळे जे प्रचंड मोठे नुकसान झाले त्याची एक रुपयाचीही नुकसान भरपाई मुंबईकरांना मिळाली नाही. ती नुकसान भरपाई दिली पाहिजे अशी आमची पहिली मागणी आहे.

शिवसेनेने सत्तेवर येण्यापूर्वी पाचशे चौरस फुटपर्यंतच्या घरांचा प्रॉपर्टी टॅक्स माफ करायचं वचन दिलं होतं. आज दोन वर्षे झाली तरी ते वचन त्यांनी पाळले नाही. ते त्यांनी ताबडतोब मान्य करावे. मुंबईकरांनी १२ महिने २४ तास उच्च दाबाने पाणी मिळाले पाहिजे. तर त्यासोबतच खड्डेमुक्त रस्ते मुंबईला दिले पाहिजे. कारण गेल्या वीस वर्षात २२ हजार करोड रुपये मुंबईच्या करदात्या जनतेचे या रस्त्यांवर खर्च झाले आहेत.

या प्रमुख मागण्या घेऊन भाजपाने हे आंदोलन पुकारले आहे. या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर आगामी काळात यापेक्षाही तीव्र आंदोलन भाजपा छेडेल” असा इशारा मुंबई भाजपाचे प्रभारी आमदार अतुल भातखळकर यांनी दिला आहे.

Exit mobile version