शालेय विद्यार्थ्यांच्या फी कपातीचा निर्णय जाहीर करून ठाकरे सरकारने अद्यापही त्यावर अध्यादेश काढलेला नाही. सरकारच्या या निर्णयाला मंत्रिमंडळातील काही शिक्षणसम्राटांचा विरोध असल्याची माहिती समोर येत आहे. या विरोधात समाजातून तीव्र प्रतिक्रिया उमटत असून विरोधी पक्षदेखील आक्रमक झाला आहे. भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार अतुल भातखळकर यांनी सुरुवातीपासूनच या फी कपातीच्या मागणीसाठी सरकार विरोधात आवाज उठवला असून सरकारच्या या घुमजाव कार्यपद्धतीवर देखील त्यांनी हल्लाबोल केला आहे.
काल म्हणजेच बुधवार, ११ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. मंत्रिमंडळाच्या या बैठकीत राज्यातील शाळांच्या फी कपतीच्या संदर्भातील अध्यादेश निघणे अपेक्षित होते. पण या अध्यादेशाला ठाकरे सरकारमधील काही मंत्र्यांनी विरोध केला. त्यामुळे ठाकरे सरकारमधील शिक्षणसम्राट मंत्री हे झारीतील शुक्राचार्य झाले आहेत का? असा सवाल विरोधक विचारताना दिसत आहेत.
हे ही वाचा:
राज्यसभेत काँग्रेस खासदारांचे प्रगल्भ, लोकशाहीवादी वर्तन
ठाकरे सरकारने एसटी कर्मचाऱ्यांचे पगार थकवले
मोदी सरकार रोज १०० किमी रस्ते बांधणार
भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर हे ट्विटरवर एक व्हिडीओ संदेश पोस्ट करत ठाकरे सरकारवर तुटून पडले आहेत. ‘राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी फी कपातीच्या बाबतीत अध्यादेशाच्या ऐवजी फक्त जीआर काढू अशी भूमिका घेऊन मंत्रिमंडळातल्या शिक्षणसम्राटांच्या समोर गुडघे टेकले आहेत. गेल्या वेळेला या संदर्भामध्ये जयंत पाटलांचे नाव आले होते. यावेळेला मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोणत्या मंत्र्यांनी अध्यादेश काढायला विरोध केला हे मुख्यमंत्र्यांनी जनतेला सांगावे. तसे न झाल्यास कुठल्या मंत्र्याच्या किती शिक्षण संस्था आहेत याचा लेखाजोखा आम्ही जनतेला जाहीर करू. मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांचा आणि पालकांच्या मागण्या पायदळी तुडवून वीजबील माफी सारखेच विद्यार्थ्यांची फी माफीचा सुद्धा बट्ट्याबोळ केला. याच्या विरोधामध्ये आमचा लढा आणि आंदोलन येणाऱ्या काळात चालू राहील.’
फी कपातीचा अध्यादेश रोखणारे ठाकरे मंत्रिमंडळातील झारीतले शुक्राचार्य कोण??? मुख्यमंत्र्यानी जाहीर करावे अन्यथा आम्ही हे बिंग फोडू… pic.twitter.com/yMf6WJeTKe
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) August 12, 2021
तर पुढे भातखळकर यांनी शिक्षणसम्राट मंत्र्यांची आणि त्यांच्या शिक्षण संस्थांची यादी ट्विटरवरून जाहीर केली. ही यादी टाईम्स नाऊ या आघाडीच्या वृत्त वाहिनीने दिली आहे. ज्यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, छगन भुजबळ, विश्वजीत कदम, सतेज पाटील, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, राजेश टोपे, अनिल देशमुख, आदिती तटकरे, अशोक चव्हाण, अमित देशमुख अशा महत्त्वाच्या मंत्र्यांचा समावेश आहे.
ही घ्या @TimesNow ने दिलेली ठाकरे मंत्रिमंडळातील शिक्षण साम्राटांची यादी. फी कपातीचा निर्णय प्रत्यक्षात का येत नाही, यासाठी काही वेगळ्या खुलाशाची गरज आहे का??? pic.twitter.com/hjXIu9zjKc
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) August 12, 2021