मुंब्र्यातील उर्दू वर्तमानपत्रांत फक्त गाझाच्या बातम्या छापल्या जातात काय?

मुंब्र्यातील उर्दू वर्तमानपत्रांत फक्त गाझाच्या बातम्या छापल्या जातात काय?

आमदार अतुल भातखळकरांनी काढला चिमटा

लोकसंख्या नियंत्रण कायद्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांनी पाठिंबा दिला हे बहुधा आव्हाडांना माहीत नसावे. मुंब्र्यातील उर्दू वर्तमानपत्रात फक्त गाझाच्या बातम्या छापल्या जातात काय? असा चिमटा भाजपा नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना काढला आहे.

उत्तर प्रदेशमध्ये लोकसंख्या नियंत्रण विधेयक आणण्यासाठी हालचाली सुरू झाल्यानंतर देशभरात त्याची चर्चा सुरू झाली. महाराष्ट्रातील राष्ट्रवादी पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी या विधेयकाला पाठिंबा दिला. पण त्यांच्याच पक्षाचे नेते आणि मंत्री जितेंद्र आव्हाड यांना आपल्या नेत्याने दिलेल्या पाठिंब्याबाबत माहिती नसावी. त्यांनी ट्विट करून या विधेयकावर टीका केली आहे.  त्यावरूनच आमदार भातखळकर यांनी आव्हाड यांना आठवण करून दिली आहे.

मागे इस्रायल आणि पॅलेस्टिन यांच्यात संघर्ष सुरू असताना जितेंद्र आव्हाड यांनी पॅलेस्टिनची बाजू घेतली होती. तेव्हाही त्यांच्यावर टीका झाली होती. तोच संदर्भात आमदार भातखळकर यांनी घेतला आहे.

हे ही वाचा:

स्पुटनिक व्ही लवकरच पुण्यात बनणार

आसाममध्ये येणार नवा गोरक्षण कायदा

टार्गेट महाराष्ट्र! वाढतोय अनधिकृत शस्त्रास्त्रांचा धोका

गोखलेला न्यायालयाने ठोकले

जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले होते की, १३ टक्के मुस्लिमांना दोनपेक्षा जास्त मुलं असतील तर ८३ टक्के हिंदूंना दोन पेक्षा अधिक मुलं असतील. लोकसंख्या विधेयक म्हणजे अब्दुलची भीती दाखवून अतुलचं म्हातारपण कष्टप्रद करण्याचा डाव आहे.

हिंदु मुस्लिम नावांचा आपल्या ट्विटमध्ये वापर करत आव्हाड यांनी हे विधेयक म्हणजे धर्मात भेदभाव करण्याचा प्रकार असल्याचा खोडसाळ आरोप केला आहे.

लोकसंख्या नियंत्रण विधेयकाबद्दल उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले होते की, लोकसंख्या वाढल्यास काय नुकसान होतं याबद्दल प्रत्येकाला सांगितलं पाहिजे. वाढती लोकसंख्या अनेक प्रश्नांचं मूळ आहे. यामुळे समाजात विषमता पसरते. चांगल्या समाजासाठी लोकसंख्या नियंत्रण आवश्यक आहे. जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त प्रत्येकाने लोकसंख्या नियंत्रणाची शपथ घेतली पाहिजे.

योगी आदित्यनाथ यांची भूमिका आव्हाड यांनी समजलेली नाही का, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे. आव्हाड यांच्या ट्विटचा नेटकऱ्यांनीही समाचार घेतला आहे. तुम्ही नावापुढे डॉक्टर ही उपाधी लावता अशी आठवण एका नेटकऱ्याने आव्हाड यांना करून दिली आहे.

Exit mobile version