अख्तरांच्या दिव्याखाली अंधार

अख्तरांच्या दिव्याखाली अंधार

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आणि वाद हे एक समीकरणच झाले आहे. यंदाचे साहित्य संमेलनही त्याला अपवाद नाही. नाशिक येथे सुरू असलेले मराठी साहित्य संमेलन सुरुवातीपासूनच वादग्रस्त ठरले होते. त्यात संमेलनाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले जावेद अख्तर यांच्या भाषणाने वादात आणखीनच भर घातली आहे. भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार अतुल भातखळकर यांनी जावेद अख्तरांच्या भाषणाचा समाचार घेतला आहे.

जावेद अख्तर यांनी भाषण करताना दिलेल्या चुकीच्या संदर्भांवर टीका करताना इतिहास लिहिणे हे पटकथा लिहिण्या इतके सोपे नाही असा घणाघात भातखळकर यांनी केला आहे. तर इंग्रजांच्या काळात भारतात उर्दू भाषा आली असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारात उर्दू शेरोशायरी कशी होत असेल? असा सवाल उपस्थित करत त्यांनी जावेद अख्तरांच्या फेकाफेकीची पोलखोल केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारात उर्दू शेरोशायरी व्हायची असे जावेद अख्तर आपल्या भाषणात म्हणाले होते.

हे ही वाचा:

दुसऱ्या कसोटीत किवींवर भारतीय गोलंदाजांचे वर्चस्व

कर्नाटकनंतर गुजरातमध्ये ओमिक्रोनची एंट्री

ठाकरे सरकारच्या चुकीमुळे वाढले नारायण राणेंचे सुरक्षा कवच?

एटीएम पडले मागे; लोक करत आहेत घरबसल्या व्यवहार

तर मोदीविरोधाची उबळ आलेल्यांसाठी साहित्य संमेलन व्यासपीठ बनले आहे असे भातखळकर म्हणाले. तर साहित्य संमेलनाच्या नावाखाली नरेंद्र मोदीं विषयी, भारतीय जनता पार्टी विषयी आपणास व्यक्त करायचे धंदे कालपासून चालू आहे त्यांचा मी तीव्र निषेध करतो असे भातखळकर म्हणाले. तर अख्तर यांना अभिव्यक्ति स्वातंत्र्याची एवढी चिंता असेल तर महाराष्ट्रामध्ये पत्रकारांना अटक झाली, त्यांच्यावर फआयआर झाले. त्याच्या विरोधात तुम्ही आवाज उठवला नाहीत.

विश्वास पाटील यांच्या नावाला भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे विरोध झाला. पण मग भ्रष्टाचाराच्या आरोपात तुरूंगात जाऊन आलेले छगन भुजबळ कसे चालतात असा सवाल भातखळकर यांनी केला आहे. तर जावेद अख्तर यांनी सांगण्याची आवश्यकता होती की मी छगन भुजबळ यांच्या मांडीला मांडी लावून बसणार नाही.

नाशिकच्या या संमेलनात साहित्य नगरीला स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव द्यायलाही विरोध झाला. सावरकर हिंदूत्वव्दी होते म्हणून तुम्ही त्यांना खलनायक करण्याचा प्रयत्न करत आहात. पण स्वातंत्र्य सैनिकांचे मुकूटमणी म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकर मोठे होतेच पण एक साहित्यिक म्हणून सुद्धा तुम्हीच काय तर तिथे जमलेले सगळेजण सावरकरांच्या बुद्धीमत्तेला पुरणार नाही इतके सावरकर के महान साहित्यिक होते असे भातखळकर यांनी म्हटले आहे.

Exit mobile version