23 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरक्राईमनामाइतक्या महत्वाच्या प्रकरणाचे खुलासे फेसबुकवर कधीपासून?

इतक्या महत्वाच्या प्रकरणाचे खुलासे फेसबुकवर कधीपासून?

Google News Follow

Related

मनसुख हिरेन यांच्या हत्येचा तपास पूर्ण झाला असून ही केस सोडवली गेली आहे असा दावा महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख शिवदीप लांडे यांनी फेसबुकद्वारे केला आहे. ही माझ्या आयुष्यातील अतिशय कठीण अशा केस पैकी एक केस होती असे लांडे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे. पण गृहमंत्रालयाने हा तपास एनआयएकडे सुपूर्द केल्यानंतर काही तासांतच ही केस उलगडल्याचा दावा एटीएस कडून करण्यात आला आहे. त्यामुळे नक्की एटीएसने या प्रकरणात काय गुंता सोडवला यावरून प्रश्न उपस्थित होत आहेत.

मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा तपास एटीएसकडून एनआयएकडे दिला जाण्यापूर्वी एटीएसने मोठी कारवाई केली. रविवारी या प्रकरणात एक निलंबित पोलिस कॉन्स्टेबल विनायक शिंदे आणि एक बुकी नरेश धरे यांना ताब्यात घेतले आहे. एटीएस पथकाने त्यांना कोर्टात हजर केले. कोर्टाने या दोघांना ३० मार्चपर्यंत एटीएसची कोठडी सुनावली आहे. या निर्णयानंतर काही तासातच महाराष्ट्र एटीएसचे प्रमुख शिवदीप लांडे यांनी फेसबूक वर पोस्ट केली आहे. “अतिशय संवेदनशील अशा मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा गुंता आता उलगडला आहे. मी माझ्या एटीएस पोलिस दलाला सलाम करतो ज्यांनी दिवस रात्र मेहनत घेऊन या प्रकरणात न्याय मिळवून दिला. माझ्या कारकिर्दीतल्या अतिशय कठीण अशा केसेस पैकी ही एक केस होती” असे शिवदीप लांडे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

हे ही वाचा:

६ जनपथवर पवार-राऊतांची खलबते

‘धनानंदां’च्या कचाट्यातून सुटकेसाठी धडपडणारा महाराष्ट्र

मनसुख हिरेन प्रकरणातील आरोपींना ३० मार्चपर्यंत एटीएस कोठडी

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यासाठी भाजपाचे आंदोलन

एकूणच या प्रकारावर भारतीय जनता पक्षाचे नेते आमदार अतुल भातखळकर यांनी सवाल उपस्थित केला आहे. अतिशय महत्वाच्या आणि जातील अशा मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा गुंता सुटला असल्याचा दावा केला जात आहे. पण इतक्या महत्वाच्या प्रकाराशी संबंधित खुलासा फेसबूकवरून करण्याची नवी पद्धत कधीपासून रूढ झाली आहे? असा सवाल भातखळकर यांनी केला आहे. गेले अनेक दिवस फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात या केसची चर्चा आहे. एनआयएने ही केस ताब्यात घेण्याच्या काही तास आधी जर खरंच या केसचा गुंता सुटला असेल आणि ही केस उलगडली असेल तर याचे तपशील जनतेसमोर खुले करावेत अशी मागणी आमदार भातखळकर यांनी केली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा