22 C
Mumbai
Tuesday, December 24, 2024
घरराजकारणदाढ्या कुरवळण्याचा प्रकार सहन करणार नाही

दाढ्या कुरवळण्याचा प्रकार सहन करणार नाही

Google News Follow

Related

मुंबईतील मालाड-मालवणी भागात सध्या टिपू सुलतानवरून चांगलेच राजकारण तापलेले दिसत आहे. मालवणी मधील एका मैदान टिपू सुलतानाचे नाव देण्याचा घाट ठाकरे सरकारने घातला आहे. महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री अस्लम शेख यांनी विकास केलेल्या या मैदानाचे नाव टिपू सुलतानच्या नावावरून ठेवले गेले. पण यावरून भारतीय जनता पार्टी आक्रमक झाली असून ‘दाढ्या कुरवळण्याचा प्रकार सहन करणार नाही’ असा इशारा मुंबई भाजपाचे प्रभारी आमदार अतुल भातखळकर यांनी दिला आहे.

यावरून भाजपाचे आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. बुधवार, २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी मालाड येथील या उद्यानाच्या बाहेर हजारोंच्या संख्येने हे कार्यकर्ते जमले असून मंत्री अस्लम शेख यांच्या विरोधात जोरदार निदर्शने आणि घोषणाबाजी करण्यात आली.

हे ही वाचा:

राजपथावर संचलन पाहायला होते ‘हे’ खास पाहुणे

भारतीय महिला हॉकी संघाला उघडले वर्ल्डकपचे दरवाजे

युवराजच्या घरी आला आणखी एक ‘युवराज’

गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांच्याविरोधात मुंबईत गुन्हा

यावेळी महाराष्ट्रद्रोही टिपू सुलतानचे नाव महाराष्ट्रात हवेच कशाला असा सवाल आंदोलकांनी केला. तर महाराष्ट्रातल्या उद्यानाला छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, झाशीची राणी लक्ष्मीबाई, महाराणा प्रताप अशा वीरांचीच नावे देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. तर यावेळी भाजपाच्या कार्यकर्त्यांची पोलिसांनी धरपकड केली आहे.

तर भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांनादेखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यावर भातखळकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून सरकारवर निशाणा साधला आहे. “टिपूच्या नावाने नामकरण करणाऱ्यांविरुद्ध आम्ही आज धडक दिली. हिंदू द्रोह्यांचा उदो उदो सहन करणार नाही. पोलीस कारवाईची आम्हाला तमा नाही. दाढ्या कुरवळण्याचा प्रकार सहन करणार नाही.” असे भातखळकर यांनी म्हटले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा