एपीआय वाझेंना तात्काळ निलंबित करा – आमदार अतुल भातखळकर

एपीआय वाझेंना तात्काळ निलंबित करा – आमदार अतुल भातखळकर

वादग्रस्त पोलीस अधिकारी सचिन वाझे यांची तात्काळ बदली करा अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे. अतुल भातखळकर यांनी एका व्हिडीओ संदेशाद्वारे ही मागणी केली आहे. आपल्या व्हिडिओमध्ये आमदार भातखळकर यांनी थेट मुंबईच्या पोलीस आयुक्तांना सवाल केला आहे.

काय म्हणाले आमदार अतुल भातखळकर?
“मनसुख हिरेन प्रकरणात संशयित असलेले सचिन वाझे अजूनही सेवेत कसे? मुंबई शहराचे पोलीस आयुक्त एका एपीआय दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्यासोबत दोन दोन तास कसली चर्चा करतात? एटीएस ज्यांचा फॉलो करत आहे अशा पोलीस अधिकाऱ्यासोबत आयुक्त चर्चा करतात. त्यांची बदली करून त्यांना नागरी सेवा दिल्याचे दाखवतात पण पुन्हा स्पेशल ब्रँच दिली जाते हे सगळे संशय वाढवणारे आहे. एपीआय वाझे यांना वाचवण्याचे प्रयत्न सुरु आहेत हा संशय बळावणारे आहे. तेव्हा सचिन वाझे यांचे तात्काळ निलंबन करा किंवा मुंबईच्या बाहेर त्यांची बदली करा.” अशी मागणी आमदार अतुल भातखळकर यांनी आपल्या व्हिडिओद्वारे केली आहे.

शनिवारी वाझे यांची एनआयए कडून चौकशी करण्यात आली. प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर आढळलेल्या जिलेटीनने भरलेल्या स्कॉर्पिओ प्रकरणात वाझे यांचा जबाब नोंदवण्यात येत आहे. शनिवारी सचिन वाझे पेडर रोड येथील राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेच्या कार्यालयात चौकशीसाठी दाखल झाले.

हे ही वाचा:

जगाला अलविदा म्हणायची वेळ जवळ येत आहे – सचिन वाझे

सचिन वाझे यांची एनआयए कडून चौकशी

औरंगजेबाची सत्तेकडे वाटचाल (भाग ४)

शिवसेनेच्या मंत्र्याने शेतकऱ्यांचे थकवले कोट्यवधी रुपये

वाझे यांच्या एनआयए चौकशीतून नेमके काय समोर येणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले आहे. दरम्यान सचिन वाझे हे एनआयए कार्यालयात दाखल होण्याआधी त्यांनी व्हॉट्सऍपला ठेवलेल्या स्टेटसमुळे चर्चेत आले. शनिवारी वाझे यांनी व्हॉट्सऍप स्टेटस ठेवत ‘जगाला अलविदा म्हणायची वेळ जवळ आली आहे’ असे म्हटले होते.

Exit mobile version