‘मा.मुं.चे ज्ञान अगाध’ भातखळकरांचा टोला

‘मा.मुं.चे ज्ञान अगाध’ भातखळकरांचा टोला

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना लिहिलेल्या पत्रावरून आता त्यांच्यावर टीका होऊ लागली आहे. शुक्रवार, २ जुलै रोजी महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना पत्र लिहून मुख्यमंत्री ठाकरे यांनी कोविडच्या कारणाने विधिमंडळ अधिवेशनाचा अवधी कमी असल्याचे सांगत विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक घेण्यात असमर्थता दर्शवली. पण मुख्यमंत्र्यांच्या या पत्रावरून भाजपा चांगलीच आक्रमक झालेली दिसत आहे. भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांनी या पत्रातील मजकुरावरून मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून सध्या राज्याचे राजकारण तापलेले आहे. राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असणाऱ्या भारतीय जनता पार्टीने पावसाळी अधिवेशनाचा कालावधी वाढवून विधानसभा अध्यक्षांची निवडणूक घेण्यात यावी अशी मागणी केली आहे. त्यासंबंधीचे निवेदन भाजपाच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना दिले होते. तर त्या निवेदनानंतर राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून अधिवेशन कालावधी वाढवून अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यात यावी असे सूचित केले होते.

हे ही वाचा:

भाजपवर आरोप केल्याशिवाय संजय राऊत यांना जेवणच पचत नाही

व्हीप बजावल्यानंतरही आमदारांना थेट फोन करण्याची वेळ का आली?

जिल्हा परिषद निवडणुका पुढे ढकलण्यासंदर्भात सुनावणी ६ जुलैला

सरकार पाडण्याशी काहीही घेणंदेणं नाही, निवडणुकीची तयारी सुरू

शुक्रवार, २ जुलै रोजी राज्यपालांच्या या पत्राला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्र लिहून उत्तर दिले आहे. या पत्रातून मुख्यमंत्री ठाकरे यांनी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यास असमर्थता दर्शवली आहे. तर उधाण ठाकरेंच्या याच पत्रावर भाजपा मुंबई प्रभारी अतुल भातखळकर यांनी हल्लाबोल केला आहे. ट्विटरच्या माध्यमातून भातखळकर यांनी या पत्राचा समाचार घेतला आहे. या ट्विटमध्ये अतुल भातखळकर म्हणतात, “राज्यपालांना पाठवलेल्या पत्रात मुख्यमंत्री महोदय म्हणतात, विधानसभा अध्यक्षाची निवड व्हावी ही सरकारची तीव्र इच्छा आहे. मा.मुं.चे ज्ञान अगाध आहे. विधानसभा अध्यक्षाची निवड हा विषय सरकारचा नसून विधानसभेचा असतो. ज्याचे ते सदस्यही नाहीत. दीड वर्षानंतर किमान एवढी माहिती असायला हरकत नाही.”

Exit mobile version