‘काही बाटगे विदेशी राज्यकर्त्यांसमोर मुजरा करीत राहिले’ असे म्हणत भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. सदोदित मराठी अस्मितेचा मुद्दा राजकारणासाठी वापरणाऱ्या ठाकरेंवर महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने भातखळकरांनी हल्लाबोल केला आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामध्ये छापून आलेल्या अग्रलेखाचा भातखळकरांनी समाचार घेतला आहे.
१ मे अर्थात महाराष्ट्र दिन कोवीडमुले मोठ्या प्रमाणात साजरा करणे शक्य नसले तरीही सोशल मीडियावर मात्र शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सगळे महाराष्ट्रवासी या महामारीच्या कठीण प्रसंगातही काही आनंदाचे क्षण शोधून ते जगण्याचा प्रयत्न करत आहेत. पण अशातच शिवसेनेने त्यांच्या मुखपत्र सामनामधून केंद्रातील भाजपा सरकारवर निशाणा साधला आहे. नेहमीप्रमाणे केंद्र सरकार महाराष्ट्राची कोंडी करत असल्याची रड सामनामधून करण्यात आली आहे. पण त्यांच्या या अग्रलेखावर भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांनी पलटवार केला आहे. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचे चिरंजीव राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना लक्ष्य केले आहे.
हे ही वाचा:
चुकांमधून न शिकणारे ठाकरे सरकार कोरोनाबाबतीत पुनश्चः अपयशी
शीतल जोशी-कारूळकर सेन्सॉर बोर्डावर
बंगालची विधानसभा निवडणूक आणि संभाव्य निकाल
काय म्हणाले भातखळकर?
आपल्या आक्रमक शैलीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या भातखळकरांनी त्याच शैलीत शिवसेनेला धारेवर धरले आहे. भातखळकरांनी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत, मिलिंद नार्वेकर यांचे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासोबतचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंसोबतच “जनाबसेना म्हणतेय, महाराष्ट्राने कधीच दिल्लीची गुलामगिरी स्वीकारली नाही. शंभरटक्के सत्य…पण काही बाटगे मात्र स्वतःच्या स्वार्थासाठी कायम दिल्ली दरबारी विदेशी राज्यकर्त्यांसमोर कमरेत वाकून मुजरा करीत राहिले.” असे खरमरीत ट्विट अतुल भातखळकर यांनी केले आहे.
जनाबसेना म्हणतेय, महाराष्ट्राने कधीच दिल्लीची गुलामगिरी स्वीकारली नाही. शंभरटक्के सत्य…
पण काही बाटगे मात्र स्वतःच्या स्वार्थासाठी कायम दिल्ली दरबारी विदेशी राज्यकर्त्यांसमोर कमरेत वाकून मुजरा करीत राहिले. pic.twitter.com/IX6bAO6onI
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) May 1, 2021