सत्ताधाऱ्यांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य संकुचित

सत्ताधाऱ्यांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य संकुचित

महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य असल्याचा खणखणीत टोला भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार अतुल भातखळकर यांनी लगावला आहे. महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाडांना भातखळकर यांनी लक्ष्य केले आहे. आमदार अतुल भातखळकर यांच्या टीकेसमोर बोलती बंद झालेल्या आव्हाड यांनी भातखळकरांना ब्लॉक करत पळ काढला. यावरूनच भातखळकर यांनी आव्हाडांना चिमटे काढले आहेत.

सोशल मीडियाच्या या जमान्यात लाईक, कमेंट, ट्विट, रिट्विट, फॉलो, ब्लॉक या साऱ्या गोष्टी अत्यंत नित्याच्या झाल्या आहेत. सामान्य माणसापासून ते प्रत्येक क्षेत्रातील प्रथितयश मान्यवरांपर्यंत सगळेच या सोशल प्लॅटफॉर्म्स वर सक्रिय असतात. त्यापैकी ट्विटरवर तर राजकीय कलगीतुराच रंगलेला असतो. आपल्या अभ्यासू आणि तितक्याच आक्रमक शैलीसाठी प्रसिद्ध असणारे भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर आणि महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड हे असेच दोन नेते. भातखळकर हे ट्विटरच्या माध्यमातून रोज ठाकरे सरकारला धोबीपछाड देत असतात तर आव्हाड हे देखील विरोधकांवर निशाणा साधत असतात.

हे ही वाचा:

दिलीप वळसे-पाटील नवे गृहमंत्री?

अनिल देशमुखांचा राजीनामा हे केवळ हिमनगाचं टोक

अखेर अनिल देशमुखांचा राजीनामा

कुबेरांच्या ‘निर्भीड’पणाचे रहस्य काय?

सोमवारी जितेंद्र आव्हाड यांनी अतुल भातखळकर यांच्या टीकेपासून आपला जीव सोडवण्यासाठी त्यांना ब्लॉक करायचा मार्ग अवलंबला. पण आव्हाडांच्या या ब्लॉक करून पळ काढण्याच्या पवित्र्यावरूनही भातखळकरांनी त्यांना धारेवर धरले आहे. “सत्ताधाऱ्यांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य संकुचित आहे” असे म्हणत अतुल भातखळकरांनी आव्हाडांवर निशाणा साधला आहे.

Exit mobile version