स्वतःबद्दल ऐकण्याची शक्ती आहे तेवढेच दुसऱ्याबद्दल बोलावे

स्वतःबद्दल ऐकण्याची शक्ती आहे तेवढेच दुसऱ्याबद्दल बोलावे

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना सुड बुद्धीने अटक केल्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय संघर्ष चांगलाच शिगेला पोहोचला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. त्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आक्षेपार्ह वक्तव्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तर उद्धव ठाकरे यांनाही अटक करण्यात यावी अशी मागणी आता केली जात आहे. यावरूनच भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी शिवसेनेला टोला लगावला असून ‘स्वतःबद्दल ऐकण्याची शक्ती आहे तेवढेच दुसऱ्याबद्दल बोलावे असा सल्ला भातखळकर यांनी दिला आहे.

उद्धव ठाकरे हे जेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नव्हते तेव्हा एका भाषणात त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर पातळी सोडून टीका केली होती. यावेळी त्यांनी आदित्यनाथ यांना जोड्याने मारण्याची भाषा केली होती. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेनंतर उद्धव ठाकरे यांच्या भाषणाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. तर उद्धव ठाकरेंवर या भाषणासाठी कारवाई का केली जात नाही? असा सवाल जनतेतून विचारला जाऊ लागला आहे.

हे ही वाचा:

कोणत्या महापालिका निवडणूका एक सदस्यीय प्रभाग पद्धतीने लढल्या जाणार?

मला गांजाची शेती करू द्या!; शेतकऱ्याची आर्त मागणी

फॅसिस्ट वळणावरचा महाराष्ट्र

काबुल विमानतळावर दहशतवादी हल्ल्याचा धोका

दरम्यान या व्हिडिओ वरून भारतीय जनता पार्टीने आता उद्धव ठाकरेंविरोधात तक्रार दाखल केल्याची माहिती पुढे आली आहे. यवतमाळ या ठिकाणी ही तक्रार नोंदवली गेली आहे. दसरा मेळाव्याच्या भाषणात योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे ही तक्रार करण्यात आली आहे. तर या मुद्द्यावरून भाजपा आक्रमक झाली असून भाजपा नेते आमदार भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. ‘स्वतःबद्दल ऐकण्याची शक्ती आहे तेवढेच दुसऱ्याबद्दल बोलावे.’ असे ट्विट करत भातखळकरांनी हल्ला चढवला आहे.

Exit mobile version