ठाकरे सरकार म्हणजे दर चार दिवसांनी नवी पुडी सोडून वेळ मारून न्यायची

ठाकरे सरकार म्हणजे दर चार दिवसांनी नवी पुडी सोडून वेळ मारून न्यायची

गेल्या वर्षभरापेक्षा अधिक काळ ऑनलाइन सुरू असलेली कॉलेजेस आता प्रत्यक्षात सुरू व्हावीत अशी मागणी जोर धरत असतानाच ठाकरे सरकारने या संदर्भातली मोठी घोषणा केली आहे. लसीकरण झाल्यानंतरच कॉलेजेस सुरु करणार असल्याचे मंत्री उदय सामंत यांनी जाहीर केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करूनच हा निर्णय घेण्यात आला आहे.

त्यासाठी लवकरात लवकर कॉलेज विद्यार्थ्यांचे लसीकरण व्हावे या दृष्टीने ठाकरे सरकार प्रयत्न करणार आहे. येणाऱ्या काळात कॉलेज विद्यार्थ्यांसाठी विशेष लसीकरण मोहीम राबवण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे उदय सामंत यांनी सांगितले आहे. पण ठाकरे सरकारच्या या घोषणा वरून भारतीय जनता पार्टीने सरकारवर निशाणा साधला आहे भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांनी सरकारच्या घोषणाबाजीवर चांगलेच ताशेरे ओढले आहेत.

हे ही वाचा:

कोर्ट म्हणाले, त्या मुलांची फी परत करा!!

महापुरामुळे चिपळूणला बसला मोठा फटका; किती झाले नुकसान?

पीव्ही सिंधूची सेमीफायनलमध्ये धडक

वीजबिल माफीवर सवाल केला आणि साहेबांचा मूड गेला

ठाकरे सरकारच्या हे कल्पनाशून्य आणि कृतिशून्य सरकार आहे असे भातखळकर यांनी म्हटले आहे. दर चार दिवसांनी नव्या घोषणा आणि नव्या कल्पनांची पुडी सोडायची आणि वेळ मारून न्यायची अशीच या सरकारची तऱ्हा आहे. घरात बसलेल्या सरकारच्या या हवेतल्या कल्पना आहेत. या सरकारला साध्या लसी विकत घेता आल्या नाहीत. शाळा, कॉलेजेस सुरू व्हावेत असे सरकारला वाटतच नाही तसे वाटत असते तर बाजारात लस उपलब्ध आहे. खाजगी रुग्णालयांना पैसे देऊन त्यांनी कॉलेज विद्यार्थ्यांचे लसीकरण करून घेतले असते. पण सरकारने तसे काहीही केले नाही असा घणाघात आमदार भातखळकर यांनी केला आहे.

Exit mobile version