आता किमान पावसाची जबाबदारी मोदींवर ढकलू नका

आता किमान पावसाची जबाबदारी मोदींवर ढकलू नका

बुधवारी मुंबईला पावसाने झोडपून काढल्यानंतर महापालिकेचे सर्व दावे धुवून निघाले आहेत. या परिस्थितीत विरोधी पक्ष असलेली भारतीय जनता पार्टी आक्रमक झाली असून भाजपा नेत्यांनी ठाकरे सरकार आणि मुंबई महापालिका प्रशासनाला धारेवर धरले आहे. भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार अतुल भातखळकर यांनी राज्य सरकार आता पावसाची जबाबदारीही मोदींवर टाकणार नाही अशी अपेक्षा करतो अशी जोरदार चपराक सरकारला लगावली आहे.

बुधवार, ९ जून रोजी पहाटेपासूनच मुंबईत पावसाची जोरदार बॅटिंग सुरू असताना भारतीय जनता पार्टीच्या मॅरेथॉन बैठका सुरू होत्या. भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय संघटन मंत्री बी.एल संतोष मुंबईमध्ये आले असून त्यांच्या उपस्थितीत भाजपाच्या या संघटनात्मक बैठका पार पडल्या. या बैठकांनंतर भाजपा मुंबई प्रभारी आमदार अतुल भातखळकर यांनी पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला.

हे ही वाचा:

सेलिब्रिटीजच्या मुंबई प्रेमावर नितेश राणे बरसले

काँग्रेसला मोठा धक्का; जितिन प्रसाद भाजपात

मुळशीमधील कंपन्यांत घुसून पाहणी करु

ठाकरे सरकारची निष्क्रियता; अस्मिता योजनेचा उडाला बोजवारा

यावेळी नालेसफाई आणि पावसाच्या बाबतीत महापालिकेने केलेले नियोजन यावर भातखळकर यांनी सडकून टीका केली. मुंबई महानगरपालिका, ठाकरे सरकारने आता पावसाचीही जबाबदारी मोदींवर ढकलू नये आणि मोदींनीच यातून मार्ग काढावा असे म्हणू नये अशी आमची अपेक्षा आहे असा टोला भातखळकर यांनी लगावला. तर पुढे त्यांनी मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्यावर हल्लाबोल केला. आयुक्तांनी आम्हाला विचारलं तर आम्ही त्यांना एवढेच सांगू की, आता तरी भ्रष्टाचार कमी करून नालेसफाई नीट करा असे भातखळकर यांनी म्हटले आहे. तर मुंबईचे पाणी साठवण्याचे स्पॉट्स आहेत. तिथे आवश्यक ती कारवाई होणे गरजेचे आहे. अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

Exit mobile version