याकूबची कबर,हिरेनची हत्या….सगळ्याचं श्रेय उद्धव ठाकरेंचंच

आमदार आशिष शेलार यांची खोचक टीका

याकूबची कबर,हिरेनची हत्या….सगळ्याचं श्रेय उद्धव ठाकरेंचंच

आमच्याच कामांचं उद्घाटन करण्यसाठी मोदी येत आहेत असं ठाकरे गटाने म्हटल्यावर आता आशिष शेलार यांनी आपल्या खास खोचक शैलीत उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज मुंबईत दौरा आहे.

विविध कामाचं भूमिपूजन आणि विविध प्रकल्पांचं लोकार्पण यासाठी पंतप्रधान मोदी मुंबईत येत आहेत.यावरून ठाकरे गटान आम्ही केलेल्या कामांचंच उद्घाटन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत येत आहेत आणि आम्ही केलेल्या कामाचं श्रेयच हे सरकार घेतं आहे अशी आरोपांची जंत्री लावली आहे.या सगळ्याला आशिष शेलार यांनी आताच आपल्या खोचक शैलीत दोन ट्विट करत उत्तर दिलं आहे.

पहिल्या ट्विट मध्ये,याकूबच्या कबर सजावटीपासून नालेसफाईतल्या भ्रष्टाचारापर्यंत सगळं श्रेय उद्धव ठाकरेंचंच आहे असं आशिष शेलार ट्विट मध्ये म्हणाले आहेत.

काय म्हटलं आहे पहिल्या ट्विट मध्ये आशिष शेलार यांनी?
याकूबची कबर सजवण, मनसुख हिरेनची हत्या, दाऊदच्या मालमत्तांची खरेदी, बदल्यांमध्ये वसुली, सचिन वाझे, रस्त्यांवर खड्डे , नालेसफाईत भ्रष्टाचार, कोविडमध्ये नातेवाईकांची भलामण,मेट्रो कारशेड रखडवणे ही तुमच्या काळातली विकासकामं आहेत. या सगळ्याचं श्रेय हे निर्विवाद उद्धव ठाकरेंचंच आहे असं आशिष शेलार यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे.

हे ही वाचा:

पाकिस्तानचे डोळे उघडले? म्हणतात, भारताशी तीन युद्धे केल्यामुळे झालो गरीब

जोशीमठमधील हॉटेलनंतर आता घरे पाडण्याचा निर्णय

पाकिस्तानात १३ वर्षांच्या हिंदू मुलींना पळवून होत आहेत विवाह, धर्मांतरण

महाराष्ट्राला मिळाली भरभक्कम गुंतवणूक

मुंबईकरांच्या आनंदावर विरजण का पाडता?
आज मानानीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमीपूजन आणि लोकार्पण कार्यक्रम होतं आहेत ही सगळी मुंबईकरांची स्वप्नपूर्ती आहे. त्यामध्ये “शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तुमचा काय संबंध? असलाच तर विरोध करण्याएवढाच म्हणूनच आज मुंबईकरांच्या स्वप्नपूर्तीच्या आनंदाच्या क्षणांत विरजण का घालत आहात” असं दुसरं ट्विटही आशिष शेलार यांनी केलं आहे. त्यामुळे आता नरेंद्र मोदींच्या दौऱ्याआधी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे विरूद्ध भाजपा असा सामना सोशल मीडियावर पाहण्यास मिळतो आहे.

आमच्याच कामांचं उद्घाटन करण्यसाठी मोदी येत आहेत असं ठाकरे गटाने म्हटल्यावर आता आशिष शेलार यांनी आपल्या खास खोचक शैलीत उद्धव ठाकरेंना ट्विटच्या माध्यमातून लक्ष्य केलं आहे.

Exit mobile version