26 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरराजकारणयाच संगतीमुळे सरकार गेले, खासदार, आमदार गेले...

याच संगतीमुळे सरकार गेले, खासदार, आमदार गेले…

आशिष शेलार यांची संजय राऊत यांच्यावर शेलकी टीका

Google News Follow

Related

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे खासदार संजय राऊत शुक्रवारी जम्मूमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याबरोबर भारत जोडो यात्रेत सहभागी झाले. भारत जोडो यात्रेत राऊत यांनी राहुल गांधी यांच्याबरोबर चालताना आलेल्या अनुभवांचे खूप कोड कौतुक केले. काँग्रेसचे गोडवे गेले आहेत. यावर भाजपचे नेते आशिष शेलार यांनी ट्विट केलं आहे. “देव, देश आणि धर्माच्या संघर्षातून गायब असलेले खासदार संजय राऊत, काँग्रेसच्या युवराजांसोबत चालायला गेले! याच संगतीमुळे सरकार गेले, खासदार, आमदार गेले, पक्षाची शकले उडाली.. “याच भल्या” कामाचा झेंडा तुम्ही घेऊन निघालाच आहात, तर तू चाल पुढं तुला र गड्या भीती कशाची!” अशी शेलकी टीका आशिष शेलार यांनी ट्विटमध्ये केली आहे.

“हिंदुत्वासाठी राम जन्मभूमीचा लढा जेव्हा लाखो कारसेवक लढत होते, तेव्हा संजय राऊत प्रभादेवीच्या गल्लीत बसून होते. 370 कलम मुक्त काश्मीर व्हावे यासाठी असंख्य जण संघर्ष करीत होते, बलिदान देत होते, तेव्हा संजय राऊत मुंबईत बसून मीडियात “ध्वनी प्रदूषण” करीत होते.” असा टोलाही आशिष शेलार यांनी राऊत यांना लगावला आहे.

हे ही वाचा:

भारतीय अर्थव्यवस्था होणार इतक्या डॉलरची

रोज होतात इतकी कोटी अंडी फस्त

महाराष्ट्र मच्छिमार संघाच्या संचालकपदी रामदास संध्ये यांची निवड

गूढ उकलले; बेपत्ता असलेल्या सदिच्छा सानेचा खून झाला!

संजय राऊत हे राहुल गांधी यांच्यावर सध्या फिदा आहेत. ते या पदयात्रेदरम्यान म्हणाले की, राहुल गांधींना माझ्याबद्दल चिंता होती. कारण मला अटक का केली हे त्यांना माहिती होतं. कोणत्या कारणासाठी माझा आणि माझ्या कुटुंबाचा छळ सुरू आहे हे त्यांना माहिती होतं. मी वाकत नाही, झुकत नाही. ‘डरो मत’ हा राहुल गांधी आणि माझा सामाईक मंत्र आहे. तेही डरो मत म्हणतात आणि मीही म्हणतो घाबरू नका. हे आमचं मैत्रीचं नातं आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा