सुप्रियाताईंनी पुन्हा एकदा गझनी सिनेमा पाहावा

भाजप नेते आशिष शेलार यांची खोचक टीका

सुप्रियाताईंनी पुन्हा एकदा गझनी सिनेमा पाहावा

केंद्र सरकार आणि राज्यातील एकनाथ शिंदेचे सरकार सुडाचे राजकारण करत आहे. आम्ही एवढी वर्ष सत्तेत होतो पण सुडाचे राजकारण कधी केले नाही, अशी टीका राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी केली आहे. त्यावर प्रतिक्रिया देतांना भाजपचे नेते आशिष शेलार यांनी सुप्रियाताईंनी पुन्हा एकदा गझनी सिनेमा पाहावा अशी माझी इच्छा आहे. कारण त्या सिनेमात शॉर्ट मेमरीचा आजार असल्याचे दाखवले होते. ताईंना असा आजार होऊ नये अशी माझी इच्छा आहे असा जोरदार टोला लगावलाआहे.

खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रजासत्ताक दिनी प्रसारमाध्यमांशी बोलताना भाजपवर टीका केली. त्या म्हणाल्या, केंद्र सरकार आणि राज्यातील एकनाथ शिंदेचे सरकार सुडाचे राजकारण करत आहे. आम्ही एवढी वर्ष सत्तेत होतो पण सुडाचे राजकारण कधी केले नाही, जो विरोधात असेल त्याच्यामागे ईडी सरकार आणि पक्षात प्रवेश केला की १०० खून माफ अशी परिस्थिती आहे. उद्धव ठाकरेंना विरोध करणे म्हणजे बाळासाहेब ठाकरेंच्या निर्णयाला विरोध करणे असे आहे अशी टीका सुप्रिया सुळे यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना केली होती.

गझनी सिनेमात शॉर्ट मेमेरीचा आजार एकाला असतो असे दाखवले आहे ताईंना असा आजार होऊ नये अशी माझी इच्छा आहे. पण त्यांची वक्तव्ये तशीच दिसत आहेत. मी संपूर्ण यादी वाचून दाखवेन ताईंना. सुडाच्या राजकारणाची भूमिका टोकापर्यंत नेणारे सरकार म्हणजे उद्धवजींचे सरकार आहे. शरद पवारांच्या समर्थनाचं आणि काँग्रेसच्या समर्थनाचं सरकार होतं. स्वतः देवेंद्रजींनी सांगितलं आहे आणि त्याचा मी साक्षीदार आहे. आज या ठिकाणी याची स्पष्टही करतोय. देवेंद्रजी म्हणाले की त्यांना छोट्या गुन्हा अडकवण्याचा प्रयत्न याच सरकारने केला आणि याचा साक्षीदार मी स्वतः आहे असे हल्लाबोल आशिष शेलार यांनी केला आहे.

हे ही वाचा:

बागेश्वर बाबांना नागपूर पोलिसांची क्लीन चीट

बंधुभाव आणला तर स्वातंत्र्य खऱ्या अर्थाने होईल साकार

श्याम मानव आणि सपा नेते स्वामी प्रसाद मौर्य यांनी माफी मागावी

बॉक्सिंग फेडरेशनने निलंबित केलेले असतानाही जय कवळी ऑलिम्पिक संघटनेत कार्यरत कसे?

त्या काळामध्ये अडीचशे पानाचा तो रिपोर्ट तत्कालीन आयुक्त संजय पांडे यांनी त्यांच्या खासगी जागेत ठेवला होता आणि नंतर सार्वजनिक कार्यालयात आणलेला रिपोर्ट मी स्वतः वाचला आहे आणि त्या रिपोर्ट मध्ये कुठल्या पानावर देवेंद्र फडणवीस यांचे नाव लिहिण्याचा तरी प्रयत्न केला हे मी स्वतः वाचलेलं आहे. केवळ दुसऱ्या गोष्टीच्या इन्क्वायरी मध्ये तिसरी गोष्ट आणणं हे काम तत्कालीन आयुक्तांकडून करून घेण्याचा प्रयत्न हे त्या वेळेच्या गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांचाच पाप होतं कोणाला सुडाचं राजकारण सांगताय ताई ? असा सवाल शेलार यांनी सुप्रिया सुळे यांना केला आहे.

त्यावेळी  दातखिळी कुठे बसली होती

त्या काळी एका संपादकाला घरातून तुम्ही अटक केलं त्याच काळामध्ये मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारले म्हणून एका सामान्य नागरिकांच जाहीर मुंडन तुम्ही केलं त्याच काळामध्ये तुम्ही विसरला असाल का पत्रकाराने कोरोनाच्या काळात व्यावसायिक बिल्डरला फिरायची मुभा का हा प्रश्न उपस्थित केला तर त्या पत्रकाराला सुद्धा काहीशे किलोमीटर वरून आणून अटक केली. आज विनयभंगाच्या गुन्ह्यावरून जितेंद्र आव्हाड आणि ताई एवढं तुम्ही आवाज करताय तुमच्याच काळामध्ये माझ्यावर विनयभंगाचा गुन्हा महापौरांनी माझ्यावर दाखल केला होता त्यावेळी तुमची दातखिळी कुठे बसली होती. अस प्रश्न शेलार यांनी केला आहे. मोहीत भारतीय, प्रसाद लाड, प्रवीण दरेकर, मी, गिरीश महाजन, स्वत: देवेंद्र फडणवीसांना अडकवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे गझनी सिनेमा पाहा. असा सल्ला शेलार यांनी सुप्रिया सुळेंना दिला.

Exit mobile version