शिवसेना शासित मुंबई महापालिकेत अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा घोटाळा सुरु आहे असा गंभीर आरोप भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार आशिष शेलार यांनी केला आहे. मराठी अधिकाऱ्यांना डावलून अमराठी अधिकाऱ्यांना बढती देत असल्याचे शेलार यांनी अधोरेखित केले आहे. तर एकूण १३२ मराठी अधिकाऱ्यांना पदोन्नती देताना महापालिका अडवणूक करत असल्याचा घणाघात शेलार यांनी केला आहे.
काय म्हणाले शेलार?
आशिष शेलार यांनी ट्विटरच्या माध्यमातून मुंबई महापालिका प्रशासनावर हल्ला चढवला आहे. ट्विटरवर एक व्हिडीओ संदेश पोस्ट करत शेलार म्हणाले, ‘पोलिसांच्या बदल्यात घोटाळा राज्य सरकारने करून दाखवला. आता मुंबई महानगर पालिका अधिकाऱ्यांच्या बढोत्रीमध्ये घोटाळा करून दाखवत आहे. १३२ मराठी अधिकाऱ्यांच्या बदल्यांना स्थापत्य समितीने मंजुरी दिली पण सभागृहात मात्र चार महिने झाले तरी मंजुरी दिली जात नाही.’
हे ही वाचा:
नारायण राणेंच्या जन आशीर्वाद यात्रेचा मार्ग ठरला
त्या लाचखोर शिक्षणाधिकाऱ्याला बेड्या
ट्विटर इंडिया प्रमुखांची उचलबांगडी
कंदहार पडले, तालिबानची राजवट अटळ?
वाटाघाटी चालू आहेत का? कुठल्या पद्धतीचा वाटाघाटी चालू आहेत? लेनदेनचा प्रकार आहे का? वसुलीचा धंदा सुरू केला आहे का? असे एका मोगोमाग एक सवालांची तोफ शेलार यांनी डागली आहे. हा सगळा प्रकार शिवसेनेच्या महानगरपालिकेत चालू आहे. मराठी माणसाचं नाव घ्यायचं पण शुभांगी सावंत ज्या मराठी अधिकारी महानगरपालिका चिटणीस पदावर बसु द्यायचा नाही आणि आता १३२ अनुसूचित जाती जमाती सहीत मराठी अधिकारी यांना त्यांच्या पदापासून दूर ठेवायचं. शिवसेनेचा हा बदल्या आणि बढोत्रीचा करोडोंचा घोटाळा आहे. याच्याबद्दल जनतेसमोर जाऊन शिवसेनेचे सगळे पितळ उघड करू.
शिवसेनेने महापालिकेत 132 मराठी अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा प्रस्ताव रोखून का धरलाय? मराठीच्या तथाकथित रखवालदारांनी मराठी अधिकाऱ्यांवर केलेला हा अन्याय आणि त्या मागे सुरु असलेला घोटाळा आम्ही मुंबईकरांसमोर उघडा करु! @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis @ChDadaPatil @BJP4Mumbai @MPLodha pic.twitter.com/UNjxW8Ef5T
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) August 13, 2021