‘ध्येयपूर्ती’साठी भाजपाचा शनिवारी माटुंग्यात मेळावा

देवेंद्र फडणवीस करणार मार्गदर्शन

‘ध्येयपूर्ती’साठी भाजपाचा शनिवारी माटुंग्यात मेळावा

आगामी मुंबई महानगरपालिका निवडणूक नजरेसमोर ठेवून भारतीय जनता पार्टीने आता जय्यत तयारी सुरू केली आहे. त्यानिमित्ताने विविध ठिकाणी कार्यकर्ता मेळावे घेऊन बांधणी केली जात आहे. माटुंगा येथे असाच एक कार्यकर्ता मेळावा आयोजित केला आहे. मुंबई ध्येयपूर्ती या कार्यकर्ता मेळाव्यात भाजपाच्या तयारीविषयी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मार्गदर्शन करणार आहेत.

शिवाय, मुंबई भाजपाचे अध्यक्ष म्हणून नियुक्त झालेले ऍड. आशीष शेलार तसेच कॅबिनेट मंत्री म्हणून नुकतीच शपथ घेतलेले मंगलप्रभात लोढा यांचा विशेष सत्कार यावेळी होणार आहे. शनिवार २० ऑगस्टला सकाळी ११ वाजता षण्मुखानंद चंद्रशेखरेंद्र सरस्वती सभागृह, माटुंगा येथे हा कार्यक्रम पार पडणार आहे.

हे ही वाचा:

‘राणा’ तुला अखेरचा सलाम; तुझे उपकार विसरता येणार नाहीत

तुमच्या आशीर्वादाने फोडू महापालिकेतील भ्रष्टाचाराची हंडी

भाविकांच्या दानधर्मातून श्रीकृष्णासाठी २५ लाखांचा पाळणा

आता महाराष्ट्रात सीबीआयला दरवाजे खुले?

 

बृहन्मुंबई महानगर पालिका हे भारतीय जनता पक्षाचे आता लक्ष्य आहे. संपूर्ण यश मिळविण्यासाठी आणि पालिकेला भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी भाजपाने जय्यत तयारी सुरू केली आहे. मुंबई महानगरपालिकेतील शिवसेनेची सत्ता खाली खेचण्यासाठी भाजपा प्रयत्नशील आहे. ते ध्येय गाठण्यासाठी आता विविध मंचांच्या माध्यमातून जोरदार तयारी केली जात आहे. दहीहंडी उत्सवातही जल्लोषासोबत मुंबई महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराची हंडी फोडण्याच्या घोषणा दुमदुमत होत्या. त्यामुळे या उत्सवांच्या माध्यमातून जनमानसात मुंबई महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराकडे लक्ष वेधले जात आहे. स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी जांबोरी मैदान, ठाणे, घाटकोपर येथील दहीहंडी उत्सवांत उपस्थित राहात मुंबई महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराला वाचा फोडली. माजी खासदार किरीट सोमय्या यांनीही घाटकोपर येथे दहीहंडीत सहभागी होत या भ्रष्टाचाराची हंडी फोडण्याचे आवाहन जनतेला केले.

 

Exit mobile version