संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या दिल्ली येथे सुरू आहे. लोकसभा आणि राज्यसभा ही दोन्ही सभागृह कार्यान्वित असून खासदार जनतेचे प्रश्न मांडत आहेत. पण आता संसदेत आज काही मोठे होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. याला कारण ठरले आहे सत्ताधारी भारतीय जनता पार्टीने आपल्या खासदारांना बजावलेल्या व्हीप!
केंद्रातील प्रमुख सत्ताधारी पक्ष असलेल्या भारतीय जनता पार्टीने आपल्या लोकसभेतील सर्व खासदारांना व्हीप बजावला आहे. लोकसभेतील भाजपाच्या सर्व खासदारांनी आज म्हणजेच गुरुवार, २४ मार्च रोजी संसदेत उपस्थिती लावावी यासाठी हा व्हीप बजावण्यात आला आहे. त्यामुळे आज लोकसभेत नेमके काय घडणार आहे याची सकाळपासूनच चर्चा सुरू झाली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.
The ruling Bharatiya Janata Party (BJP) has issued a whip to all its Lok Sabha MPs to be present in the House today, March 24.
— ANI (@ANI) March 24, 2022
हे ही वाचा:
सुजित पाटकर व इतरांविरुद्ध सोमय्यांची एस्प्लनेड न्यायालयात याचिका
ठाणे महापालिका आयुक्त शिवबंधनात?
‘द केरळ स्टोरी’ चित्रपटातून होणार आणखी ‘फाइल’ उघड
लग्न करून धर्मांतराला नकार दिला म्हणून हिंदू तरुणीची हत्या
संसदेतील कोणत्याही सभागृहात मग ते लोकसभा अथवा राज्यसभा, जेव्हा खासदारांना व्हीप बजावला जातो तेव्हा त्यांना सभागृहात उपस्थित राहणे बंधनकारक असते. समजा काही कारणास्तव ते उपस्थित राहिले नाहीत आणि व्हीपचे उल्लंघन केले तर त्यांची कृती कारवाईस पात्र असते. अनेकदा जेव्हा एखाद्या महत्त्वाच्या विषयांवर संसदेत चर्चा असते किंवा एखादा महत्त्वाचा कायदा पारित करायचा असतो तेव्हा मतदानाच्या दृष्टीने सर्व खासदारांना उपस्थित राहण्यासाठी व्हीप बजावला जातो.
सध्या भारतीय जनता पार्टीने चार राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक जिंकत आपली सत्ता कायम ठेवली आहे. त्यामुळे देशातले वातावरण भाजपाच्या दृष्टीने सकारात्मक असे झाले आहे. तर राजकीयदृष्ट्या ही भाजपचे बळ वाढल्याचे म्हटले आहे. त्यामुळे या वातावरणाचा फायदा घेत एखादा महत्त्वाचा कायदा लोकसभेत मंजूर करण्यासाठी पटलावर ठेवला जाऊ शकतो का? अशी चर्चा निर्माण झाली आहे. केंद्रातील सत्ताधारी भाजपाचा आजवरचा इतिहास बघता ते अशा प्रकारचा धक्कातंत्राचा कायमच वापर करत असतात. त्यामुळे आज लोकसभेत नेमके काय घडणार याकडे देशाची नजर असणार आहे. सकाळी अकरा वाजता सभागृहाचे कामकाज सुरू होणार असून त्यानंतरच या गोष्टीवरचा पडदा हटेल.