तेज प्रताप यादवांचा अजब तर्क, म्हणे बिहारमधील पूल कोसळायला भाजपा जबाबदार

पत्रकारांच्या प्रश्नावर कॅबिनेट मंत्री तेज प्रताप यादव यांचे उत्तर

तेज प्रताप यादवांचा अजब तर्क, म्हणे बिहारमधील पूल कोसळायला भाजपा जबाबदार

बिहारमधील भागलपूर येथील पूल कोसळल्यानंतर राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान, बिहारचे कॅबिनेट मंत्री तेज प्रताप यादव यांनी अजब तर्क लावत हा पूल कोसळल्याबद्दल भारतीय जनता पक्षाला (भाजपा) जबाबदार धरले आहे. आम्ही पूल बांधतो आणि भाजपा त्यांना उद्ध्वस्त करत आहे, असं यादव म्हणाले. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव हे बिहारमधील पूल कोसळल्यानंतर राजीनामा देणार का? असा सवाल करताच त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

भागलपूरमध्ये गंगा नदीवरील बांधकामाधीन पूल कोसळल्याने खळबळ उडाली आहे. ३.१६ किमी लांबीचा हा पूल खगरिया जिल्ह्याला भागलपूरशी जोडणार होता. खगरिया, अगुवानी आणि सुलतानगंज दरम्यान गंगा नदीवर पुलाचा मधला भाग बांधला जात होता. मागील वर्षीही या पुलाचा काही भाग कोसळला होता.

हे ही वाचा:

लोकशाहीवर प्रश्न उपस्थित करणाऱ्या राहुल गांधींना अमेरिकेचे सडेतोड उत्तर

धक्कादायक! पुतण्याने बॉलला हात लावला म्हणून काकाचे बोट कापले

अहमदनगरमध्ये औरंगजेबाचे फोटो नाचवणाऱ्या चार जणांना अटक

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सुरीनामच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित!

दरम्यान, पूल कोसळल्याप्रकरणी भाजपाने बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. नितीश कुमार आणि तेजस्वी यादव हे त्यांच्या पदाचा राजीनामा देतील का? असा सवाल भाजप नेते अमित मालवीय यांनी उपस्थित केला आहे. २०१५ मध्ये नितीश कुमार यांनी या पुलाचे उद्घाटन केले, जो २०२० पर्यंत पूर्ण होणार होता. हा पूल दुसऱ्यांदा कोसळला आहे. या घटनेची दखल घेऊन नितीश कुमार आणि तेजस्वी यादव तात्काळ राजीनामा देतील का? असे केल्याने दोन्ही काका आणि पुतणे देशासमोर एक उदाहरण ठेवू शकतात, असं मालवीय म्हणाले आहेत.

Exit mobile version