भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने श्रीनगरमधील लाल चौकात कारगिल युद्धात शहीद झालेल्या सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी तिरंगा यात्रा काढण्यात आली. लाल चौकात हजारो लोकांनी हातात तिरंगा घेऊन मोठा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. या तिरंगा यात्रेचे नेतृत्व भाजपा युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि बंगलोरचे खासदार तेजस्वी सूर्या यांनी केले. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा तीस वर्षांपूर्वीचा जुना फोटो शेअर केला आहे. फुटीरतावाद्यांच्या धमक्या असतानाही त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल चौकात तिरंगा फडकावला होता.
पंतप्रधान मोदींच्या तीस वर्षांपूर्वीच्या आठवणींना तेजस्वी सूर्या यांनी उजाळा दिला आहे. त्यांनी ट्विटरवर पंतप्रधान मोदींचा फोटो शेअर करत म्हटले की, काही वर्षांपूर्वी लाल चौक देशविरोधी आणि फुटीरतावादी भावनांनी भरलेला होता. तिथे तिरंगा फडकवण्याचे धाडस करणाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी दहशतवाद्यांनी दिली होती. पण १९९२ मध्ये नरेंद्र मोदीजींनी अभिमानाने तिथे तिरंगा फडकावला होता. त्यामुळे आज तीस वर्षांनंतर तिरंगा तिथे पुन्हा फडकवता येत आहे. दरम्यान, तीस वर्षांपूर्वी पंतप्रधान मोदींनी लाल चौकात फक्त तिरंगा फडकवला नव्हता तर जोरदार भाषणही केले होते.
कुछ साल पहले, लाल चौक देशद्रोही और अलगाववादी भावनाओं से भरा हुआ था।
तिरंगा फहराने की हिम्मत करने वालों को आतंकियों ने हत्या की धमकी दी थी। 1992 में श्री @narendramodi जी ने गर्व के साथ यहां तिरंगा फहराया, जिसके कारण @BJYM आज 30 साल बाद इसे पुनः फहरा पाया है।#TirangaAtLalChowk pic.twitter.com/G6Zx0zrPXU— Tejasvi Surya (@Tejasvi_Surya) July 25, 2022
हे ही वाचा:
मुंबईच्या धर्मेश बराईचा जलशक्ती मंत्रालयातर्फे सन्मान
पाचव्या मजल्यावरून चिमुरडी पडली! तिला कुणी झेलले?
पुण्यात शिकाऊ विमान शेतात कोसळलं, पायलट जखमी
“आदिवासी मुलगी देशाच्या सर्वोच्च घटनात्मक पदापर्यंत पोहचते हे लोकशाहीचे सामर्थ्य”
दोनशेहून अधिक कार्यकर्त्यांनी बाईकवर श्रीनगर ते कारगिल अशी तिरंगायात्रा काढली. याआधीही अनेक राजकीय पक्षांनी लाल चौकात तिरंगा फडकवण्यासह कार्यक्रम आयोजित केले आहेत, परंतु कारगिल युद्धात शहीद झालेल्या सैनिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी कोणत्याही राजकीय पक्षाकडून अशा प्रकारची रॅली आयोजित करण्याची ही पहिलीच वेळ आहे.