‘मुंबई महापालिकेत भाजपचेच कमळ फुलणार’

‘मुंबई महापालिकेत भाजपचेच कमळ फुलणार’

मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणूकींची तयारी आता सुरू झाली असून भाजपा कार्यकारणीची बैठक मंगळवारी २५ जानेवारी रोजी मुंबईत पार पडली. भाजपचे मुंबईतील प्रमुख पदाधिकारी, खासदार आमदारांची विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आणि मुंबई भाजप अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली महत्वाची बैठक पार पडली. यानंतर भाजपा नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महापालिकेत भाजपाचीच सत्ता येणार असल्याचा दावा केला.

निवडणुका योग्य वेळी झाल्या पाहिजेत. त्या होत नसतील तर कारण काय? आणि त्याबाबतची स्पष्टता जोपर्यंत जनता आणि आमच्यासमोर येणार नाही तोवर याबाबत प्रतिक्रिया देण्याची गरज नाही. पण सर्वसाधारणपणे मुंबई महापालिकाच्या निवडणुका वेळेत होणे हे कायद्याला अभिप्रेत आहे. त्यासाठी मुंबई महापालिका सर्व पावले उशिराने टाकत आहे का? असा आमच्यासमोर प्रश्न आहे, असे आशिष शेलार म्हणाले.

हे ही वाचा:

देशविरोधी भाषण करणाऱ्या शर्जिल इमामविरोधात देशद्रोहाच्या खटल्याचे आदेश

वनडे मालिका विजयानंतर दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू म्हणतो जय श्री राम

वर्ध्यात भीषण अपघात; आमदाराच्या मुलासह ६ विद्यार्थी ठार

राज्यातील ८९ टक्के नमुने हे ओमायक्रोन बाधित; आठव्या चाचणीचे निष्कर्ष

मुंबई महापालिका निवडणुका कधीही येऊ देत. सत्ताधाऱ्यांना चारी मुंड्या चित करण्यासाठीच्या मुंबईतील जनतेच्या मनातील इच्छा पूर्ण करणारा ठोस कार्यक्रम ठरला आहे. आगामी कार्यक्रमांची तयारी सुरु झाली आहे. या सगळ्या चर्चेतून पुन्हा एकदा नव्या दमाने मुंबई महापालिकेत भाजपचेच कमळ फुलणार हा संकल्प घेऊन बैठक घेतल्याचे आशिष शेलार यांनी सांगितले.

Exit mobile version