‘मराठी मुस्लिम संकल्पनेचा प्रचार करणारे तोतया’

आशिष शेलार यांनी ठाकरे गटावर टीकास्त्र डागले.

‘मराठी मुस्लिम संकल्पनेचा प्रचार करणारे तोतया’

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने राजकारण करीत मराठी माणसांवर मुस्लिमांचे राज्य आणण्याचा प्रयत्न करणारेच तोतया असल्याचा घणाघात आशिष शेलार यांनी ठाकरे गटावर केला आहे. भारतीय जनता पार्टीने ‘जागर मुंबईचा’ अभियान सुरू केले आहे. या अभियानाची पहिली सभा वांद्रे पूर्वमध्ये शासकीय वसाहतीतील मैदानात झाली. यावेळी मुंबई भाजपा अध्यक्ष अ‍ॅड. आशीष शेलार, खासदार पूनम महाजन, मुंबई भाजप प्रभारी अतुल भातखळकर, आमदार पराग अळवणी उपस्थित होते. यावेळी आशिष शेलार यांनी ठाकरे गटावर टीकास्त्र डागले.

महापालिकेत पंचवीस वर्षे सत्ता असताना विकास कामांवर मते मागण्याऐवजी मुस्लीम तुष्टीकरणाची वेळ का आली आणि मुंबईचा रंग तुम्ही का बदलू पाहात आहात, असे सवालही शेलार यांनी केले. ते म्हणाले, स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी मराठी मुस्लिम संकल्पनेचा प्रचार करत आहेत. मात्र त्यांना मराठी गुजराती, मराठी उत्तर भारतीय आणि मराठी हिंदू या संकल्पना मान्य नाहीत. त्यांनी मतांसाठी मुस्लीम तुष्टीकरण सुरू केले असले तरी मराठी आणि मुस्लीमही भाजपाच्याच पाठीशी उभे राहतील, असा विश्वास शेलारांनी व्यक्त केला आहे.

कोकणातील मराठी मुस्लिम बांधव कधीही वेगळी चूल मांडत नाहीत. ते सण व उत्सवात आणि सुख दु:खात सहभागी होतात. मग तुम्ही का वेगळी चूल मांडताय ? जाती धर्माच्या आधारे मते मागण्याची वेळ का आली, असे सवाल शेलारांनी ठाकरेंना केले आहेत.

हे ही वाचा:

एका लग्नाची पुढची गोष्टचा १२,५०० वा प्रयोग, राज-फडणवीस उपस्थित राहणार

दिवंगत पत्रकार पांडुरंग रायकर यांना राष्ट्रवादीकडून ती मदत अद्याप नाही, पत्नीने केली विनंती

उत्तराखंड भूकंपाने हादरले

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा जाणार गुवाहटीला

महापालिकेतील भ्रष्टचारावरसुद्धा यावेळी त्यांनी भाष्य केले. महापालिकेतील बारा हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे काय झाले, याचा जाब विचारणार असल्याचे शेलार म्हणाले. करोनाकाळात किती भ्रष्टाचार केला, याचा जाब मागणार आहोत. तसेच महाविकास आघाडी सरकारने जनतेचे नुकसान केल्याची टीका आशिष शेलार यांनी यावेळी केली.

Exit mobile version