दोनशेहून अधिक ठिकणी भाजपाकडून मुंबईत ‘प्रकाशोत्सवा’चे आयोजन

मुंबईत संपूर्ण महत्वाच्या ठिकाणी दिवाळीचा प्रकाशोत्सव साजरा करण्यात येणार आहे.

दोनशेहून अधिक ठिकणी भाजपाकडून मुंबईत ‘प्रकाशोत्सवा’चे आयोजन

मुंबईमध्ये मराठमोळा दीपोत्सव साजरा केला जाणार आहे. संपूर्ण मुंबईतील २३३ ठिकाणी मुंबईकरांची थेट सेवा आणि आनंदउत्सव भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून करणार असल्याची माहिती मुंबईचे भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी दिली आहे. आज, २० ऑक्टोबर रोजी आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेत दिवाळी कार्यक्रमांची माहिती दिली.

मुंबईत सर्व महत्वाच्या ठिकाणी दिवाळीचा प्रकाशोत्सव साजरा करणार असल्याचं आशिष शेलार म्हणाले आहेत. दिवाळी कार्यक्रमाबद्दल माहिती देताना आशिष शेलार म्हणाले की, १९ ऑक्टोबरला जांबोरी मैदानामध्ये मराठमोळा दीपोत्सव साजरा केला. त्याप्रमाणे मुंबईतील महत्त्वाच्या ठिकाणी प्रकाशोत्सव साजरा केला जाणार आहे. शनिवार, २२ ऑक्टोबरला सायंकाळी दीपसंध्या म्हणून, हिंदू फ्रेंड सोसायटी पटांगण जोगेश्वरीला प्रकाशोत्सवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. गीत, संगीत नृत्य आणि स्थानिक कलाकारांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे.

तसेच, २३ ऑक्टोबर रोजी विद्यामंदिर शाळा सभागृह दहिसर याठिकाणी दीपसंध्या कार्यक्रम आयोजित केले आहे. सोमवार, २४ ऑक्टोबरला सकाळी दिवाळीच्या पहिल्या दिवशी वांद्रे पश्चिम आणि गोरेगाव पूर्व येथे दिवाळी पहाटचे आयोजन करण्यात आले आहे. २५ ऑक्टोबरला सकाळी ६ वाजता दादर येथे शिवाजी पार्क आणि गिरगाव येथे दिवाळी पहाटचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आशिष शेलार यांनी दिली आहे.

हे ही वाचा:

मुंबईत परवानगीशिवाय फटाके विकता येणार नाहीत

भारताविरोधी वक्तव्य करणाऱ्या ब्रिटनच्या गृहमंत्र्यांचा राजीनामा

समीर वानखेडेंनी केलेल्या तक्रारीची राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाकडून दखल

रितेश, जीनिलीयाच्या कंपनीवर मेहेर नजर का?

पुढे ते म्हणाले, २१ ऑक्टोबरला म्हणजेच उद्या भाजपा पक्षाचे पदाधिकाऱ्यांचे दीपावली मिलन आयोजित करण्यात आले आहे. हे कार्यक्रम सोडून २३३ कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याचे शेलार म्हणाले. या कार्यक्रमात गायक, गीत आणि संगीत क्षेत्रातील काही प्रमुख लोक या कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत. तसेच सिनेसृष्टीतीलही कलाकार येणार आहेत.

मुंबईकरांसाठी भाजपा आणि मुंबईकरांच्या उत्सवात भाजपा असतो. मुंबईकरांच्या आनंदउत्सवात देखील भाजपा असतो, हे चित्र आज मुंबईत निर्माण झालं आहे. जे दुसऱ्याच्या यश अपयशावर जळत राहतात ते दुसऱ्यांसाठी आनंदाने दिवे कसे लावणार आणि त्यामुळे जे दुसऱ्याच्या यशावर नेहमी वृत्तपत्रात लिहतील किंवा टोमणा सभा घेतील ते काही दिवे लावण्याच्या प्रकाशोत्सवात नसतील, अशी टीकाही आशिष शेलार यांनी विरोधकांवर केली आहे.

Exit mobile version