दिल्ली विधानसभा निवडणुका जवळ आल्या असून दिल्लीत यंदा तीनही प्रमुख पक्ष आमनेसामने उभे ठाकले आहेत. भाजपा, आप आणि काँग्रेस यांच्यात तिरंगी लढत होणार आहे. अशातच भाजपाने दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी त्यांच्या उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली आहे. केंद्रीय निवडणूक समितीने मंजूर केलेल्या या यादीत नऊ विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांची नावे देण्यात आली आहेत.
पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयातून ही यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. भाजपने आतापर्यंत एकूण ७० विधानसभा मतदारसंघांपैकी ६८ जागांवर आपले उमेदवार जाहीर केले आहेत. बुरारी आणि देवळी या उर्वरित दोन जागांवर भाजप आपले उमेदवार उभे करणार नसून ते मित्र पक्षांना देण्यात येतील अशी शक्यता असल्याचे बोलले जात आहे. जेडीयू आणि एलजेपी (आर) या दोन आघाडीच्या घटक पक्षांना या जागा देण्यात येतील आणि बिहारमधील दोन्ही पक्ष प्रत्येकी एका जागेवर आपले उमेदवार उभे करतील.
चौथ्या यादीत बवाना विधानसभा मतदारसंघ येथून रवींद्र कुमार, वजीरपूरमधून पूनम शर्मा, दिल्ली कॅन्टोमेंट विधानसभा मतदारसंघातून भुवन तंवर संगम, विहार विधानसभा मतदारसंघमधून चंदन कुमार चौधरी, ग्रेटर कैलाशमधून शिखा राय, त्रिलोकपुरी येथून रविकांत उज्जैन, शाहदरा विधानसभा मतदारसंघातून संजय गोयल, बाबरपूरमधून अनिल वशिष्ठ आणि गोकलपूर येथून प्रवीण निमेष यांना संधी देण्यात आली आहे.
हे ही वाचा :
इंदिरा गांधी महान नेत्या, पण आमच्यासाठी त्याकाळी खलनायक!
सैफ अली खानवर हल्ला प्रकरण : केजरीवाल बरसले
इस्रायल आणि हमासमध्ये युद्धविराम; ओलिसांची होणार सुटका
जादूटोणा आरोपावरून दिलेली फाशीची शिक्षा ओरिसा कोर्टाने रद्द केली
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने नऊ उमेदवारांची चौथी यादी गुरुवारी जाहीर केली. चौथ्या यादीत दोन महिला उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. वजीरपूर विधानसभा मतदारसंघातून पूनम शर्मा यांना, तर ग्रेटर कैलाश मतदारसंघातून शिखा राय यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने तरुण आणि नवीन चेहऱ्यांना उमेदवारी देण्याचा प्रयत्न केल्याचे चित्र आहे. तर काही माजी खासदारांनाही निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे.
#DelhiElections2025 | BJP releases the fourth list of 9 candidates for the upcoming elections. pic.twitter.com/JQgoDtPRUf
— ANI (@ANI) January 16, 2025