‘भ्रष्टाचाराचा कोविड’ वरून भाजपा आक्रमक

‘भ्रष्टाचाराचा कोविड’ वरून भाजपा आक्रमक

Source: ANI

कोविड-१९ काळात महाराष्ट्रात कोविड केअर सेंटर मध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत, भाजपाने आज विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन सुरु केले आहे. कोविड-१९ काळात महाराष्ट्रात जम्बो रुग्णालये बांधण्यात आली. या जम्बो रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या भाषणातून सांगितले होते. या रुग्णालयांच्या निविदांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचीही माहिती त्यांनी दिली होती. त्याचवेळी आम्ही लवकरच या भ्रष्टाचारासंबंधीचा अहवाल प्रसिद्ध करणार आहोत, असेही ते म्हणाले होते. काल (३ मार्च) भाजपाकडून हा अहवाल सादर करण्यात आला.

“कोविडच्या काळात मुंबई मध्ये जो प्रचंड मोठा भ्रष्टाचार झाला, त्या सर्व घटनांचे संकलन करून आमदार अमित साटम यांनी ही पुस्तिका तयार केली आहे. आम्ही ही पुस्तिका मुख्यमंत्र्यांना भेट म्हणून पाठवणार आहोत. कोरोनाच्या नावाने कोणी आपला चांगभलं करून घेतलं हे मुंबईकरांना कळेल.”असे देवेंद्र फडणवीस यांनी पुस्तिकेचे प्रकाशन करताना सांगितले.

हे ही वाचा:

‘भ्रष्टाचाराचा कोविड’ ही पुस्तिका भाजपा कडून प्रकाशित

“कोवीडच्या लाटेत महाराष्ट्राचे हाल होत होते. जनता भरडली जात होती. पण अशावेळी राज्यकर्ते मात्र टक्केवारीचा मलिदा खाण्यात मश्गुल होते. पीपीई किट्स, थर्मामीटर, ऑक्सिमीटर इथपासून ते डेड बॉडी बॅग्स, ऑक्सिजन सिलेंडर अशा सर्वच गोष्टींच्या खरेदीत भ्रष्टाचार झाला आहे. या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करण्याचा प्रयत्न या पुस्तिकेच्या माध्यमातून करण्यात आला आहे. पण ही केवळ झलक असून अजून खोदकाम बाकी आहे.” अशी प्रतिक्रिया आमदार अमित साटम यांनी ‘न्युज डंकाशी’ बोलताना दिली.

Exit mobile version