कार्यकर्त्यांच्या कष्टामुळे भाजपाचे वटवृक्षात रूपांतर

आमदार अतुल भातखळकर यांनी व्यक्त केले मत

कार्यकर्त्यांच्या कष्टामुळे भाजपाचे वटवृक्षात रूपांतर

असंख्य कार्यकर्त्यांच्या कष्टातून आणि योगदानातून भारतीय जनता पक्षाचे रूपांतर आज वटवृक्षात झाले आहे. राष्ट्रवादी विचारधारा अंत्योदयाचा सिद्धांत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाला आत्मनिर्भर बनवण्यासाठी भारतीय जनता पक्ष अविरत परिश्रम घेत असल्याचे प्रतिपादन भाजप नेते आमदार अतुल भातखळकर यांनी केले.

कांदिवली पूर्व विधानसभेतील आ. भातखळकर यांच्या जनसंपर्क कार्यालयात भारतीय जनता पक्षाचा ४४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी आ. भातखळकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

हे ही वाचा:

ज्ञानवापी मशीद प्रकरणाची सुनावणी आता १४ एप्रिलला

काँग्रेसला रामराम ठोकून अनिल अँटनीनी धरला भाजपाचा हात

ऐरोली-मुलुंड खाडी पुलाला जोडणार , नवी मुंबईतील पाम बीच रोडच्या विस्तारीकरणाचा प्रकल्प मार्गी

सत्तेसाठी जन्माला आलो नाही. सत्ता आपल्यासाठी एक साधन

 

यावेळी आमदार भातखळकर म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या कुशल नेतृत्वाखाली सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास तसेच ‘राष्ट्र प्रथम’ या मंत्राला आदर्श ठेवून सर्व समावेशक कार्यशैलीतून भारतीय जनता पक्षाकडून देशात विकास सुरू असल्याचेही ते म्हणाले. यावेळी उपस्थित भाजप कार्यकर्त्यांना त्यांनी स्थापना दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी कांदिवली पूर्व विधानसभेतील भाजपचे पदाधिकारी, माजी नगरसेवक कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. यावेळी कांदिवली पूर्व विधानसभेत ८ प्रभागात भाजप स्थापना दिन उत्साहात साजरा झाला.

Exit mobile version