भारतीय जनता पक्ष (भाजप) हा ६ एप्रिल रोजी आपल्या स्थापनेला ४२ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त पंधरवड्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करणार आहे. सामाजिक न्याय पंधरवड्याच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या लोककल्याणकारी योजना जिल्ह्या-जिल्ह्यापर्यंत आणि मंडळांपर्यंत नेण्याचे काम भाजपचे कार्यकर्ते करणार आहेत.
राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा हे भाजप मुख्यालयावर ध्वजारोहण करणार आहेत. डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करतील. रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती भाजपचे सरचिटणीस अरुण सिंह यांनी पक्ष मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
सकाळी १० वाजता पंतप्रधान ऑनलाईन माध्यमातून देशातील कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. भाजपच्या ४२ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच शोभायात्रा निघणार आहे. ह्या शोभायात्रेत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांपासून ते इतर सर्व नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी सहभागी होणे अपेक्षित आहे. तशा सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच ध्वजारोहणाचा कार्यक्रमही पार पडणार आहे.
हे ही वाचा:
आता आयएनएस विक्रांतसाठी संजय राऊतांचा आकांत
कलम ३७० हटवल्यानांतर, नरेंद्र मोदी जम्मू काश्मीरला करणार पहिला दौरा
सरसंघचालक मोहन भागवतांच्या उपस्थितीत डेहराडूनमध्ये संघाची महत्वपूर्ण बैठक
७ एप्रिल ते २० एप्रिल दरम्यान देशभरात भाजपाकडून सामाजिक न्याय पंधरवडा साजरा केला जाणार आहे. सामाजिक न्याय पंधरवड्याच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या लोककल्याणकारी योजना जिल्ह्या-जिल्ह्यापर्यंत आणि मंडळांपर्यंत नेण्याचे काम भाजपचे कार्यकर्ते करणार आहेत. १२ एप्रिल हा दिवस लसीकरण दिन म्हणून साजरा करणार असून १३ एप्रिल रोजी देशभरात गरीब कल्याण अन्न योजनेशी संबंधित कार्यक्रम होणार आहे. १४ एप्रिल रोजी बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बूथ स्तरावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहेत. १५ एप्रिल रोजी अनुसूचित जमातीच्या कल्याणासाठी केलेले कार्य आणि त्यासोबतच समाजासाठी विशेष कार्य करणाऱ्या अनुसूचित जमाती समाजातील व्यक्तींचा गौरव भाजप कार्यकर्त्यांकडून करण्यात येणार आहे.