भाजपा उत्तर प्रदेशात आगामी विधानसभा निवडणूक अपना दल आणि निषाद पक्षासोबत युती करून लढणार असल्याचे भाजपाने शुक्रवारी जाहीर केले. राज्यातील इतर मोठ्या पक्षांनी – समाजवादी पार्टी, बहुजन समाज पार्टी आणि काँग्रेसने – निवडणुकीत एकटे जाण्याची घोषणा केली आहे. विविध जातींवर लक्षणीय प्रभाव असलेल्या छोट्या पक्षांवर सर्व मोठ्या पक्षांची नजर आहे.
BJP will contest the 2022 Assembly polls in alliance with Nishad Party under the leadership of CM Yogi Adityanath and PM Narendra Modi: UP BJP chief Swatantra Dev Singh in Lucknow pic.twitter.com/zzuJSCgkCP
— ANI UP (@ANINewsUP) September 24, 2021
उत्तर प्रदेश भाजपाचे अध्यक्ष स्वतंत्र देव सिंह यांनी लखनऊमध्ये प्रसारमाध्यमांना संबोधित करताना सांगितले की, “मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपा निषाद पक्षासोबत युती करून २०२२ ची विधानसभा निवडणूक लढवेल. उत्तर प्रदेशातील २०२२ च्या विधानसभा निवडणुकांसाठी अपना दलसुद्धा भाजपाच्या नेतृत्वाखालील आघाडीचा एक भाग असेल.” उत्तर प्रदेश भाजपाचे प्रभारी धर्मेंद्र प्रधान म्हणाले.
अपना दल हा पक्ष २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वीपासूनच भाजपाचा मित्रपक्ष राहिला आहे. पक्षाच्या प्रमुख अनुप्रिया पटेल यांना नुकत्याच झालेल्या मोदी मंत्रिमंडळाच्या विस्तारात राज्यमंत्री पद मिळाले आहे. अपना दलचा प्रभाव पूर्वांचलच्या ओबीसी मतदारांवर मोठ्या प्रमाणावर आहे. त्याचबरोबर निषाद पक्ष २०१९ लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपा सोबत आला आहे. निषाद पक्षाचा प्रभाव निषाद समाजावर मोठ्या प्रमाणात आहे.
सध्या उत्तर प्रदेश विधानसभेत निषाद पक्षाचा एक आमदार आहे. संजय निषाद यांचा मुलगा प्रवीण हा संत कबीर नगरचा खासदार आहे. नुकताच झालेल्या फेरबदलात संजय निषाद यांनी त्यांचा मुलगा आणि खासदार प्रवीण निषाद यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश न केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती.
हे ही वाचा:
मोदी सरकारच्या काळात अखेर लष्कराची पुनर्रचना होणार
ब्रिटनच्या इस्लामिस्ट खासदारांचे काश्मीरवर नवे उपद्व्याप
काँग्रेसमध्ये रागाला जागा नाही, पण अपमानाला आहे?
आसाम सरकारने मुक्त केली मंदिरांची जमीन
धर्मेंद्र प्रधानांनी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या मोदी सरकारच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चारही केला. ते म्हणाले की, ते एमएसपीवर कृषी उत्पादन खरेदी करून, सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देऊन किंवा शेती विपणन पायाभूत सुविधांवर १ लाख कोटी रुपये खर्च करून, “भाजपाला शेतकऱ्यांचा, विशेषत: लहान शेतकऱ्यांचा आशीर्वाद आहे.”