मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपची बांधणी

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपची बांधणी

आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर विरोधी पक्ष असलेल्या भाजपने आता तयारीला सुरुवात केली आहे. भाजपने मुंबई महापालिकेवर भाजपची सत्ता आणण्यासाठी तयारीला सुरुवात केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी ४ फेब्रुवारी रोजी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याबरोबर चर्चा करून भाजपच्या एकूण २५ समित्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर भाजपा यंदाची महापालिका निवडणूक आमदार आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासोबत चर्चा करुन समित्या गठित करण्यात आल्या आहेत. या निवडणुक संचालन समितीमध्ये खासदार गोपाळ शेट्टी, मनोज कोटक, खासदार पूनम महाजन आणि किरीट सोमय्या हे विशेष आमंत्रित असतील अशी माहिती भाजपचे मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

समित्यांची यादी खालीलप्रमाणे

निवडणूक संचालन समिती

जाहिरनामा समिती

प्रशासन समन्वय समिती

प्रसार माध्यम आणि समाज माध्यम समिती

झोपडपट्टी संपर्क समिती

संसाधन समिती

आरोपपत्र समिती

बाह्य प्रसिद्धी समिती

प्रसिद्धी सामुग्री व्यवस्थापन समिती

बुथ संपर्क समिती

निवडणूक आयोग संपर्क समिती

ज्येष्ठ कार्यकर्ता संपर्क समिती

जाहीर सभा समिती

वॉर रुम समिती

ओबीसी संपर्क समिती

उत्तर भारतीय संपर्क समिती

व्यापारी व छोटे व्यावसायिक संपर्क समिती

दक्षिण भारतीय संपर्क समिती

श्रमिक संपर्क (असंघटीत) समिती

विशेष संपर्क समिती

अल्पसंख्यांक संपर्क समिती

नव मतदार संपर्क समिती

महिला संपर्क समिती

प्रवासी कार्यकर्ता समिती

यापूर्वी भाजपा कार्यकारणीची बैठक मंगळवारी २५ जानेवारी रोजी मुंबईत पार पडली होती. भाजपचे मुंबईतील प्रमुख पदाधिकारी, खासदार, आमदारांची विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आणि मुंबई भाजप अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली महत्वाची बैठक पार पडली होती. यानंतर भाजपा नेते आणि आमदार आशिष शेलार महापालिकेत भाजपाचीच सत्ता येणार असल्याचा दावा केला होता.

Exit mobile version