28 C
Mumbai
Friday, November 15, 2024
घरराजकारणमुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपची बांधणी

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपची बांधणी

Google News Follow

Related

आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर विरोधी पक्ष असलेल्या भाजपने आता तयारीला सुरुवात केली आहे. भाजपने मुंबई महापालिकेवर भाजपची सत्ता आणण्यासाठी तयारीला सुरुवात केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी ४ फेब्रुवारी रोजी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याबरोबर चर्चा करून भाजपच्या एकूण २५ समित्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर भाजपा यंदाची महापालिका निवडणूक आमदार आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासोबत चर्चा करुन समित्या गठित करण्यात आल्या आहेत. या निवडणुक संचालन समितीमध्ये खासदार गोपाळ शेट्टी, मनोज कोटक, खासदार पूनम महाजन आणि किरीट सोमय्या हे विशेष आमंत्रित असतील अशी माहिती भाजपचे मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

समित्यांची यादी खालीलप्रमाणे

निवडणूक संचालन समिती

  • आशिष शेलार, अध्यक्ष
  • राहुल नार्वेकर
  • कालिदास कोळंबकर
  • प्रकाश मेहता
  • नितेश राणे

जाहिरनामा समिती

  • पुनम महाजन, अध्यक्ष
  • योगेश सागर, सचिव
  • सुनील राणे
  • आर. यू. सिंह
  • राजहंस सिंह
  • प्रभाकर शिंदे

प्रशासन समन्वय समिती

  • प्रविण दरेकर

प्रसार माध्यम आणि समाज माध्यम समिती

  • अतुल भातखळकर, अध्यक्ष
  • राम कदम
  • अमरजीत मिश्रा
  • विवेकानंद गुप्ता

झोपडपट्टी संपर्क समिती

  • गोपाळ शेट्टी
  • आर. डी. यादव
  • तृप्ती सावंत

संसाधन समिती

  • मनोज कोटक

आरोपपत्र समिती

  • अमित साटम, अध्यक्ष
  • भालचंद्र शिरसाट
  • विनोद मिश्रा

बाह्य प्रसिद्धी समिती

  • पराग अळवणी

प्रसिद्धी सामुग्री व्यवस्थापन समिती

  • मिहिर कोटेचा
  • पराग शाह

बुथ संपर्क समिती

  • संजय उपाध्याय

निवडणूक आयोग संपर्क समिती

  • प्रकाश मेहता
  • कृपाशंकर सिंह

ज्येष्ठ कार्यकर्ता संपर्क समिती

  • भाई गिरकर

जाहीर सभा समिती

  • प्रसाद लाड

वॉर रुम समिती

  • प्रतिक क्रर्पे

ओबीसी संपर्क समिती

  • मनिषा चौधरी

उत्तर भारतीय संपर्क समिती

  • आर. यू. सिंह
  • जयप्रकाश ठाकूर
  • अमरजित सिंह
  • जयप्रकाश सिंह
  • ज्ञानमूर्ती शर्मा

व्यापारी व छोटे व्यावसायिक संपर्क समिती

  • राज पुरोहित

दक्षिण भारतीय संपर्क समिती

  • कॅप्टन सेल्वन

श्रमिक संपर्क (असंघटीत) समिती

  • हाजी अराफत शेख

विशेष संपर्क समिती

  • आचार्य पवन त्रिपाठी
  • विद्या ठाकूर

अल्पसंख्यांक संपर्क समिती

  • वसीम खान

नव मतदार संपर्क समिती

  • तेजिंदर सिंग तिवाना
  • पल्लवी सप्रे
  • आरती पुगांवकर

महिला संपर्क समिती

  • शलाका साळवी
  • शितल गंभीर

प्रवासी कार्यकर्ता समिती

  • संजय पांडे

यापूर्वी भाजपा कार्यकारणीची बैठक मंगळवारी २५ जानेवारी रोजी मुंबईत पार पडली होती. भाजपचे मुंबईतील प्रमुख पदाधिकारी, खासदार, आमदारांची विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आणि मुंबई भाजप अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली महत्वाची बैठक पार पडली होती. यानंतर भाजपा नेते आणि आमदार आशिष शेलार महापालिकेत भाजपाचीच सत्ता येणार असल्याचा दावा केला होता.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
190,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा