पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान १७ एप्रिलला होणार आहे. अशावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालमध्ये जोरदार प्रचारमोहीम राबवली आहे. वर्धमान इथं आयोजित प्रचार रॅलीत बोलताना पंतप्रधान मोदी यांनी तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी याच्यावर जोरदार टीकास्त्र डागलं. ममता बॅनर्जी केंद्रीय यंत्रणांविरोधात कार्यकर्त्यांना भडकावण्याचं काम करत आहेत. दीदी तुम्हाला राग काढायचा तो माझ्यावर काढा, मला शिव्या घाला, अशा शब्दात मोदींनी ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय.
ममता बॅनर्जी आणि त्यांच्या पक्षाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केल्याचा आरोप पंतप्रधान मोदी यांनी केलाय. दीदी आणि त्यांचे कार्यकर्ते बंगालमधील अनुसूचित जातीतील आमच्या बांधवांना शिव्या घालत आहेत. त्यांना भिकारी संबोधत आहेत. १४ एप्रिलला बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. बाबासाहेबांच्या जयंतीपूर्वीच दीदी आणि त्यांच्या लोकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केल्याचा आरोप मोदींनी केलाय.
याशिवाय भाजपाने तृणमूल काँग्रेसच्या एका नेत्रीविरुद्ध आज राष्ट्रीय दलित आयोगाकडे तक्रारही केली आहे. सुजाता मंडल खान यान तृणमूलच्या नेत्रीने दलित समाजाबद्दल अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप भाजपाने केला आहे. “भिकारी स्वभावाने गरीब असतात किंवा अभावाने. पश्चिम बंगालमधील दलित समाज हा स्वभावाने भिकारी आहे.” असे विधान सुजाता मंडळ खान या तृणमूलच्या नेत्रीने केले आहे. भाजपाने या विधानावर आक्षेप घेत राष्ट्रीय दलित आयोगाकडे तक्रार देखील नोंदवली आहे.
हे ही वाचा:
रेमडेसिवीर!! भाजपाने ‘आणून दाखवले’!!
लोकांना घरात बंद करून काहीही साध्य होणार नाही- भाजपा
शरद पवारांवरील शस्त्रक्रिया यशस्वी
गेल्या चार टप्प्यात झालेल्या मतदानानंतर ९२ जागा जिंकण्याचा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलाय. आतापर्यंत चार टप्प्यात झालेल्या मतदानानंतर भाजप ९२ पेक्षा जास्त जागा जिंकेल. दीदी आपल्या भाषणात बंगालपेक्षा माझंच नाव अधिक घेतात. त्या जेवढ्या शिव्या मला देतात त्याचा हिशेब नाही, असा टोला अमित शाह यांनी लगावला आहे.