23 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरराजकारणभाजपची केरळवर नजर; मंत्र्यांसह उतरवले प्रसिद्ध चेहरे!

भाजपची केरळवर नजर; मंत्र्यांसह उतरवले प्रसिद्ध चेहरे!

भाजपडकून लोकसभा निवडणुकीसाठी १९५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

Google News Follow

Related

भाजपने शनिवारी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी १९५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यात उत्तर प्रदेश, दिल्लीसह अनेक राज्यांच्या जागांचा समावेश आहे. भाजपच्या पहिल्या यादीत केरळच्या उमेदवारांचीही नावे आहेत. सध्या केरळमध्ये भाजपचा एकही खासदार नाही. पक्षाने पहिल्या यादीत केरळमधून अनेक हाय प्रोफाइल उमेदवारांना मैदानात उतरवले आहे. यात केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर आणि व्ही. मुरलीधरन यांचाही समावेश आहे. दोन्हीही नेते सध्या राज्यसभेचे खासदार आहेत.

केंद्रीय राज्यमंत्री राजीव चंद्रशेखरन यांना थिरुवनंतपूरम् येथून मैदानात उतरवण्यात आले आहे. येथे काँग्रेसनेते शशी थरूर विद्यमान खासदार आहेत. तर, चित्रपट अभिनेता सुरेश गोपी याला त्रिशूर जागेवरून उमेदवारी देण्यात आली आहे. तर, माजी संरक्षण मंत्री एके अँटनी यांचा मुलगा अनिल एंटनी याला पथनमथिट्टा येथून उमेदवारी देण्यात आली आहे. एमटी रमेश हे कोझिकोड येथून उमेदवार आहेत. पकक्कडमधून सी कृष्णकुमार व अलाप्पुझा येथून शोभा सुरेंद्रन निवडणुका लढतील. तर, मलप्पूरम येथून डॉ. अब्दुल सलाम, पोन्नानीमधून निवेदिता, अट्टिंगलमधून व्ही. मुरलीधरन, वडकरामधून प्रफुल्ल कृष्ण, कासरगोडमधून एमएल अश्विनी आणि कन्नूरमधून सी रघुनाथ यांना तिकीट मिळाले आहे. केरळमध्ये लोकसभेच्या एकूण २० जागा आहेत. यातील १२ नावांची घोषणा भाजपने केली आहे.

हे ही वाचा:

… अन् मुकेश अंबानी यांच्या डोळ्यांत तरळले अश्रू

‘सीमा मर्यादा कराराचे चीनने पालन करणे आवश्यक’

पाकिस्तानमध्ये आणखी एका मोस्ट वाँटेड दहशतवाद्याची हत्या

वातावरण बदलाचा परिणाम वेळास कासव महोत्सवावर

गेल्या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये उत्तर भारतात भाजपचे एकतर्फी राज्य राहिले आहे. दक्षिणेत केवळ कर्नाटक राज्यातच भाजपने चांगली कामगिरी केली आहे. मात्र तमिळनाडू आणि केरळमध्ये भाजपला फारसे यश मिळालेले नाही. त्यामुळे यंदा पहिल्याच यादीत केरळच्या १२ उमेदवारांची नावे जाहीर करून भाजपने केरळकडे लक्ष केंद्रित केल्याचे दिसत आहे.

केरळमधून मुस्लिम उमेदवार
भाजप मुस्लिम उमेदवाराला संधी देत नाही, असा आरोप केला जातो. यंदा मात्र भाजपने एका मुस्लिम उमेदवाराला तिकीट दिले आहे. केरळच्या मलप्पूरम येथून डॉ. अब्दुल सलाम रिंगणात उतरतील. सन २०१९मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता आणि दोन वर्षांनंतर त्यांनी निवडणूकही लढवली होती. केरळमध्ये भाजपचा एकही खासदार नाही. गेल्या लोकसभा निवडणुकीत केरळमधून काँग्रेसला सर्वाधिक १५ जागा मिळाल्या होत्या. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हेदेखील केरळच्या वायनाड मतदारसंघाचे खासदार आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा