नालेसफाईचा दावा फोल, टक्केवारीच्या कारभाराचे भाजपाकडून पोस्टमार्टम

नालेसफाईचा दावा फोल, टक्केवारीच्या कारभाराचे भाजपाकडून पोस्टमार्टम

मंगळवारी भारतीय जनता पार्टी मुंबईतर्फे शहरातील नालेसफाईचे वास्तव जनतेसमोर आणले गेले. मुंबईत ७० टक्के नाल्यांची सफाई करण्यात आल्याचा दावा मुंबई महापालिकेने केला होता. पण महापालिकेच्या या दाव्याचे मुंबई भाजपाकडून पोस्टमार्टम करण्यात आले आहे. मुंबई महापालिका क्षेत्रातील विविध नाल्यांचे फोटो एकत्रित करून त्याचा एक व्हिडिओ मुंबई भाजपाने प्रसारित केला आहे. हा व्हिडिओ प्रसारित करून भाजपाने महापालिकेच्या दाव्याची चांगलीच पोलखोल केली आहे.

मुंबई महापालिका निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली असताना भारतीय जनता पार्टी चांगलीच आक्रमक झालेली दिसत आहे. पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेला भाजपाकडून विविध मुद्द्यांवरून घेरले जात असून भाजपाला उत्तर देता देता शिवसेनेच्या तोंडाला फेस येत आहे. त्यातच आता भारतीय जनता पार्टीने मुंबई महापालिकेच्या नालेसफाईच्या दाव्याचे वस्त्रहरण केले आहे.

हे ही वाचा:

मुख्यमंत्र्यांचे ज्ञान, अज्ञान की वाफा?

लसीकरण झालेल्यांना लोकलने प्रवास करायला द्या

धनगर समाज आरक्षणासाठी जागर करणार

शिवसेना आमदाराच्या कार्यालयातूनच मद्य वाटप

भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेत ‘मुंबई महापालिकेचा नालेसफाईचा दावा हा बोगस आहे’ असा गंभीर आरोप केला होता. त्या आरोपालाच पुष्टी देणारा एक व्हिडिओ भाजपातर्फे प्रसारित करण्यात आला आहे. मुंबई भाजपच्या ट्विटर खात्यावर प्रसारित झालेल्या या व्हिडिओमध्ये मुंबई महापालिका हद्दीतील विविध नाल्यांचे कचरा साचलेले फोटो हे प्रसारित करण्यात आले आहेत. या फोटोंच्या आधारे पुन्हा एकदा भाजपने महापालिकेच्या दाव्यातील हवाच काढून टाकली आहे.

या व्हिडिओद्वारे भाजपाने नालेसफाईचे खरे वास्तव जनतेसमोर आणले आहे. तर ‘मुंबईकरांच्या कराचा पैसा नक्की जातोय तरी कुठे?’ असा सवाल भाजपने विचारला आहे. कोट्यावधी खर्च नंतरही नाल्यांमध्ये गाळ आणि कचरा दिसत असल्याचे भाजपने म्हटले आहे. हे महापालिकेच्या टक्केवारीच्या कारभाराचे पोस्टमार्टम असल्याचे भाजपाने म्हटले आहे.

Exit mobile version